🌟परभणीत प्रमुख देवस्थानाला भेटी देऊन बालविवाह प्रतिबंधक कायद्याची जनजागृती....!


🌟बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास 1098 ला संपर्क करून प्रशासनास सहकार्य करण्याच्या सुचना🌟

परभणी (दि.२३ एप्रिल) - अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात विवाह होत असतात त्यात बालविवाहाचे प्रमाण ही अधिक असते. त्याला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना केल्या गेल्या त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कैलास तिडके, बालरक्षक शिक्षक बाळासाहेब बिरादार, बाल संरक्षण कक्षाचे मिलिंद कांबळे, चाईल्ड लाईनचे संदीप बेंडसुरे यांनी जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंह  मंदिर पोखर्णी, दत्ताधाम मंदिर, श्रीक्षेत्र त्रिधारा मंदिर,हिंग्लजमाता मंदिर व  इतर देवस्थानांना भेटी दिल्या. 

या दरम्यान अध्यक्षा महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांच्या आदेशानुसार जर मंदिरात किंवा प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी बालविवाह झाल्यास बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार संपूर्ण ट्रस्ट बरखास्त करण्यात येईल असे सूचित केले व तसा फलक देवस्थानांच्या दर्शनी भागात लावण्यात आला तसेच तेथील विवाहविषयक रजिस्टर तपासण्यात आले कोणताही बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास 1098 ला संपर्क करून प्रशासनास सहकार्य करण्याचे सुचित केले....

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या