🌟परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील ताडबोरगावात पोटच्या मुलानेच केली बापाची निर्घृण हत्या....!


🌟बाप घर खर्चाला पैसे देत नसल्याने निर्दयी मुलाने केली रागाच्या भरात कुऱ्हाडीचे घाव घालून बापाची हत्या🌟 


परभणी/मानवत (दि.२६ एप्रिल) - परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी भयंकर घटना घडली असून वडील दारुच्या वेसनापोटी घरी खर्चायला पैसे देत नसल्याने व दारू पिवून पैसे उडवत असल्याचा राग मनात धरुन पोटच्या मुलानेच कुऱ्हाडीने अत्यंत निर्दयीपणे बापाच्या मानेवर व खांद्यावर वार करून खून केल्याची घटना घडली आहे. 

या घटने संदर्भात अधिक वृत्त असे की मानवत तालुक्यातील या भयंकर घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दत्तात्रय देवीदास भोकरे असे असून आरोपी मुलगा परमेश्वर दत्तात्रय भोकरे याच्या विरोधात मानवत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली  आहे या संदर्भात बाबासाहेब दत्तात्रय भोकरे यांनी मानवत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की दि.२४ एप्रिल २०२३ रोजी रात्री ०९-०० ते दि.२५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०४-४५ वाजेच्या दरम्यान ताडबोरगाव येथील सूर्यभान काजळे यांच्या शेतात दत्तात्रय देवीदास भोकरे यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता. मानवत पोलिस ठाण्याचे बिट अंमलदार पोह भारत नलावडे , नामदेव पवार,राजु इंगळे यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  घटनास्थळी जावून पाहणी केली मयत व्यक्तीची संपूर्ण माहिती काढली. त्यात हा मृत्यू म्हणजे खूनच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २४ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळेस यातील आरोपी परमेश्वर भोकरे  याने त्याचे वडील दत्तात्रय देविदास भोकरे हे घर खर्चाला पैसे न देता त्यांच्या मित्रासोबत दारू पिवून पैसे उडवत होते याचा राग मनात धरुन कुऱ्हाडीने,  घातक हत्याराने त्यांच्या मानेवर व खांद्यावर मारहाण करुन खून केला, या आशयाच्या फिर्यादीवरुन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटकही करण्यात आलेली आहे. मानवत ठाण्याचे पोनि स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोउपनि किशोर गावंडे हे पुढील तपास करीत आहेत. परभणी पोलीस अधीक्षक रागसुधा आर मॅडम, उप विभागीय पोलीस अधिकारी गोफने, पोनि स्वामी यांनी घटनास्थळी भेट दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या