🌟गंगाखेडवासीयांची आ.डॉ.रत्नाकर गुट्टें यांनी केली शुद्ध फसवणूक ?


🌟माजी आमदार डॉ.मधुसूदन केंद्रे यांनी केला गंभीर आरोप : ना विकासनिधी,ना विकास केवळ गप्पा🌟

गंगाखेड (दि.२३ एप्रिल) - राष्ट्रीय समाज पक्षाचे स्थानिक आ.डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड शहरांसह विधानसभा मतदारसंघात विकास कामांच्या केवळ गप्पा मारत सर्व सामान्य नागरिकांची शुद्ध फसवणूक केली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी केला.

आपल्या संपर्क कार्यालयात रविवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. केंद्रे यांनी डॉ.गुट्टे यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली गुट्टे यांनी सातत्याने विकास कामांच्या गप्पा मारल्या, केंद्र व राज्य पुरस्कृत योजना खेचून आणल्याचा दावा केला, परंतु या योजनांचा निधी आला ना विकास झाला असे स्पष्ट करीत  गुट्टे यांनी केवळ गप्पा मारीत गंगाखेड विधानसभावाशियांची शुद्ध फसवणूक केली आहे. असे ते म्हणाले गंगाखेड नगरपालिके अंतर्गत जी काही विकास कामे झाली, काही कामे सुरू आहेत, ती केवळ महाविकास आघाडीच्या सरकारने मंजूर केलेल्या निधीतीलच आहे,गुट्टे यांनी शहराकरिता नया पैसा सुद्धा आणला नाही, केवळ कार्यकर्त्यांना  कोट्यवधीचा निधी देऊ असे अमिष दाखवून स्वतः कडे कार्यकर्ते वळवण्याचा , फसवणुकीचा प्रकार पध्दतशिरपणे सूरू आहेत. गुट्टे यांच्या या एकंदरीत कार्यपद्धतीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निश्चितच सडेतोड उत्तर देईल तसेच गंगाखेड नगरपालिकेच्या हद्दीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राष्ट्रवादीचे घड्याळ हे चिन्ह आशीर्वाद यात्रेद्वारे पोहोचले जाईल असे डॉ. केंद्रे यांनी म्हटले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या यात्रेचा शुमारंभ करण्यात आला आहे अशी ही माहिती दिली.

 यावेळी डॉ. मिथिलेश केंद्रे, माधवराव भोसले, श्रीकांत भोसले, बालाजीराव शेटे,संजय तिरवट, सय्यद अकबर, सुनील चौधरी,गोपीनाथ लव्हाळे, चंद्रकांत खंदारे, संदीप केंद्रे, दिलीप सारडा, नागनाथराव कासले यांच्यासह अन्य उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या