🌟पुर्णेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन...!


🌟आज शुक्रवार दि.०७ एप्रिल रोजी भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली १८ तास अभ्यास उपक्रम घेण्यात आला🌟

पुर्णा ( दि. ०७ एप्रिल) - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध जयंती मंडळाच्या वतीने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज शुक्रवार दि. ०७ एप्रिल रोजी भदंत डॉ उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली १८ तास अभ्यास उपक्रम सकाळी ०६ ते रात्री १२ वाजता पर्यंत घेण्यात आला असून हा उपक्रम बुद्ध विहार पूर्णा येथे आयोजित करण्यात आला होता या उपक्रमाचे अध्यक्ष भंते पय्यावंश हे होते तर या उपक्रमाचे आयोजन सिद्धांत थोरात, नितीन नरवाडे यांनी केले होते या १८ तास अभ्यास उपक्रमात २०० ते २५०  विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल गवळी, विजय खंडागळे राहुल धबाले, पृथ्वीराज खंडागळे, सुमेध काळे, राजू जोंधळे, विकास वाव्हळे ,मंगेश गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या