🌟परभणी जिल्ह्यातील गायरान वनीकरण धारकांनी जमीनी ऑनलाईन करुन घेण्याचे आवाहन....!


🌟मानवी हक्क अभियानच्या वतीने करण्यात आले आवाहन🌟

परभणी (दि.१७ एप्रिल) - मागील अनेक वर्षापासून संपूर्ण देशभर लाखो गोरगरीब नागरिक गायरान वनीकरण व गाळपेरा जमीनीवर अतिक्रमण करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. शासनाने अनेक परिपत्रक काढूनही प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे अतिक्रमीत जमीनी या नागरिकांच्या नावाने अद्याप पर्यंत झालेल्या नाहीत.

मानवी हक्क अमियानाचे संस्थापक ॲड.एकनाथराव आवाड यांनी २००७ ते २०१० या कालावधीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून १९८९ च्या शासन परिपत्रकानुसार १७ पुराव्यानिशी तहसीलदार, उपविभागीय जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, महसूल आयुक्त, महसुलमंत्री, मुख्यमंत्री यांना नावे करण्यात यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.परंतु राजकीय प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे सदर गायरान जमीनी नावे झाल्या नाहीत. महाराष्ट्रात ॲड.एकनाथराव आवाड  यांच्या नंतर मानवी हक्क अभियानवे राष्ट्रीय अध्यक्ष तथा जेएनयु दिल्लीचे प्रा.डॉ.मिलिंद आवाड यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील २८ राज्यातील संस्था संघटना मिळून देशपातळीवरील कास्तकर, गायरान वनीकरण व गाळपेरा व त्या त्या राज्यातील जमीनीच्या प्रकारानुसार ऑनलाईन नोंदणी जिओ टॅगिंग (नोट कॅम) फोटो सहीत नोंदणी करण्याचे काम चालू आहे तसेच महाराष्ट्रात मानवी हक्क अभियान ही एकमेव संघटना नोंदणी करत आहे.

तरी परभणी जिल्ह्यातील सर्व अतिक्रमीत गायरान वनीकरण व गाळपेरा धारकांनी नोंदणी करुन घेण्यासाठी पप्पुराज शेळके, किरण कसाब जिंतूर, भिमाशंकर वैराळे पाथरी ,अजय हिवाळे मानवत ,सुदाम लोंढे पालम, अनिल कांबळे गंगाखेड,विलास रणखांब पुर्णा ,अथवा मानवी हक्क अभियान जिल्हा कार्यालय सहकार नगर जुना पेडगाव रोड, परभणी येथे संपर्क करण्याचे आवाहन पप्पुराज शेळके मारोती साठे प्रविण भोरे अरुण सोनवणे मीनाताई अवचार गणेश जोगदंड, दादाराव कांबळे सिध्दार्थ वैराळे बाळासाहेब नवगिरे, दिपक भालेराव आदींनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या