🌟पुर्णा तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब शिधा पत्रिका धारकांपर्यंत आनंदाचा शिधा पोहोचला काय ?


🌟जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी तात्काळ चौकशी करुन या गंभीर प्रश्नाचे उत्तर शोधण्याची आवश्यकता🌟 

पुर्णा (दि.११ एप्रिल) - पुर्णा शहरासह तालुक्यातील ११५ शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत शिधा पत्रिका धारकांना गुडी पाडवा,भिम जंयतीसह रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर वाटपासाठी शासनाकडून 'आनंदाचा शिधा' ज्यात १ किलो रवा,१ किलो साखर,१ किलो गोडतेल,१ किलो चनादाळ आदींचा समावेश असून पुर्णा शहरातील १५ शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांना या आनंदाच्या शिध्याचे किट पुरवठा विभागाकडून दि.०२ एप्रिल ते ०८ एप्रिल २०२३ या कालावधीत शिधा पत्रिका धारकांना वितरीत करण्यासाठी देण्यात आल्या असल्या तरीही अनेक शिधा पत्रिका धारकांपर्यंत या आनंदाच्या शिध्याच्या किट पोहोचल्याच नसल्यामुळे शिधा पत्रिकाधारकांमध्ये तिव्र आसंतोष पसरला आहे.

हिंदुचा महत्वाचा सन व नवीन वर्ष असलेल्या गुडी पाडवा सनाला अर्धा महिना उलटल्यानंतर पुरवठा विभागाकडून शहरासह तालुक्यातील ११५ शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांना या आनंदाच्या शिध्याचे वितरण करण्यात आले यात शहरातील १५ शासकीय स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून ३६८१ शिधापत्रिका धारकांना 'आनंदाचा शिधा' वाटपासाठी देण्यात आला होता परंतु संबंधित स्वस्त धान्य दुकानदार भिम जयंती महोत्सवाला अवघा दोन/तिन दिवसांचा कालावधी उरला असतांना देखील आनंदाचा शिधा वाटप न करता या आनंदाच्या शिध्याचा काळाबाजार करून सर्वसामान्य गोरगरीब शिधापत्रिका धारकांच्या आनंदावर विरझन घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या