🌟कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा परभणी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम नियोजन सुरू.....!


🌟स्वाती घोडके यांनी खरीप पूर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन केले नियोजन🌟 

परभणी तालुक्यातील मौजे.कारेगाव येथे प्रकल्प संचालक आत्मा परभणी दौलत चव्हाण प्रकल्प उपसंचालक प्रभाकर बनसावडे आणि तालुका कृषी अधिकारी परभणी,नित्यानंद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा, परभणी श्रीमती.स्वाती घोडके यांनी खरीप पूर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले.

यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच बीज प्रक्रिया, निंबोळी अर्क, सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग पी. एम. एफ. एम. इ. आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य विषयी आहारातील तृणधान्याचे महत्त्व, तसेच कृषी विभागातील वेगवेगळ्या योजना आणि आत्मअंतर्गत महिला व पुरुष गट स्थापनेचे निकष, तसेच बीज प्रक्रिया, निंबोळी अर्क, पी. एम. एफ. एम. इ. या सर्व योजनांचे लीफलेट फोल्डर शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आणि सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या