🌟पुर्णेत उद्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अमृत नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात रक्तदान शिबिर...!


🌟रक्तदान शिबिरासह थायरॉईड तपासणी (Thyroid test) आणि सिबीसी (CBC test) तपासणीचे मोफत आयोजन🌟


पुर्णा (दि.१७ एप्रिल) - पुर्णा शहरातील अमृत नगर परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उद्या श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिराचे व थायरॉईड तपासणी (Thyroid test) आणि सिबीसी (CBC test) तपासणीचे मोफत आयोजन करण्यात आले आहे रुग्णालयामध्ये ज्या वेळी रुग्णांना रक्त लागते आणि हव्या असलेल्या गटाचे रक्त मिळत नाही त्या वेळी आपल्याला रक्तदानाचे महत्त्व खऱ्या अर्थाने कळते. ज्यावर अशी वेळ आलेली नसते त्यांना रक्तदानाचे महत्त्व जाणवणार नाही. हे जरी खरे असले तरी गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सार्‍यांनाच शस्त्रक्रियेसाठी रक्त लागेल हे वास्तव आहे त्यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

*रक्तदान हेच जीवनदान...रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान*

या संकल्पना रुजू लागल्या आहेत रक्तदान शिबिर घेणे ही काळाची गरज बनली आहे.  दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त 18 एप्रिल मंगळवार रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. तरी इच्छुकांनी या रक्तदान करून त्रासलेल्या व्यक्तींना  जीवनदान द्यावे. असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अमृत नगर पूर्णा वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या