🌟परभणी जिल्ह्यातल्या मानवत तालुक्यातील अंधारा मारुती येथे बैलगाडी पडून ३ युवक जख्मी....!


🌟जखमी युवकांतील एकास पुढील उपचारासाठी हलवले परभणी येथील रुग्नालयात हलवण्यात आले आहे🌟

परभणी (दि.०६ एप्रिल) - परभणी जिल्ह्यातल्या मानवत शहरापासून ०१ किलोमीटर अंतरावरील राज्य महामार्ग क्रमांक ६१ लगत असलेल्या अंधारा मारुती येथे आज गुरुवार दि.०६ एप्रिल २०२३ रोजी गाड्या ओढी पोर्णिमा असल्यामुळे येथे बैलगाडा ओढण्याची प्रथा आहे

धार्मिक परंपरेनुसार आज बैलगाडा ओढीत असतांना बैलगाडीवरून पडून ०३ युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली या तिघा जखमी युवकातील एक युवक राजू बारहाते यास पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आले असून अन्य दोन जखमी युवक भिमा ठाकूर व शरद दहे यांच्यावर मानवत येथील मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत तिनही जखमी युवक मानवत येथील रहिवासी असल्याचे समजते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या