🌟पुर्णेत आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन....!


🌟भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त' शिबीराचे आयोजन🌟

पुर्णा (दि.२८ एप्रिल) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त'रूरल डेव्हलपमेंट सोसायटी संचलित, नवचेतना महाराष्ट्र' (एकल महिला राज्यस्तरीय संघटन) आयोजित पूज्य भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो (महासचिव, अ.भा.भि.संघ, महाराष्ट्र प्रदेश) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजन करण्यात आले आहे. 


तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी नवचेतना महाराष्ट्र आयोजित सर्व आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी खालील प्रसिध्द डॉक्टर्स उपस्थित राहणार आहेत. तरी गरजु रूग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे उद्घाटक पूज्य भन्ते पंय्यावंश यांनी केले असून शिबिरात मध्ये होणाऱ्या तपासण्या डोळ्यांच्या सर्व आजारांची तपासणी, मोतीबिंदू चा फेको विधि लेझर द्वारे बिन टाक्याचे ऑपरेशन,काळा मोतीबिंदू, डोळ्यांचे हायप्रेशर कमी करण्यासाठी उपचार,डोळ्यांच्या जखमा वर उपचार,डोळ्यांच्या पडद्यावर उपचार, पापण्यावरील गाठीवर उपचार, डोळ्यांचे ऑपरेशन सवलतीत करण्यात येतील तसेच मेंदूच्या सर्व आजारांवर उपचार, मिर्गी, फिट्स, एपिलेप्सी, वर उपचार हात, पाय दुखणे सुन्न, कमजोर होणे, स्मरणशक्ती कमी होणे यावर उपचार,डोकेदुखी मायग्रेन चक्कर यावर उपचार, पार्किन्सन , मणक्याचे आजारावर उपचार, हाडांच्या सर्व तपासण्या करण्यात येतील, दातांच्या सर्व तपासण्या करण्यात येतील,

या शिबिरास तज्ञ डॉक्टर मंडळी उपस्थित राहणार आहेत डॉ.चौधरी एहसान अ रहेमान. (नेत्रतज्ञ.) डॉ. अफरोज फातिमा (न्यूरोलॉजिस्ट) डॉ माजिद खान, वैद्यकीय अधिकारी सायन हॉस्पिटल मुंबई, डॉ. विनय विजय बगाटे  (हाडांचे, व वातविकार तज्ञ) डॉ. संदीप जोंधळे (एमडी) नवजीवन हॉस्पिटल पूर्णा डॉ. बालचंद थोरात (दंतरोग तज्ञ) स्थळ बुद्ध विहार पूर्णा दिनांक 29/04/2023 वेळ सकाळी 10 ते 03 तरी गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा अशी विनंती रुरल डेव्हलपमेंट सोसायटी संचलित नवचेतना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष राम भालेराव यांनी केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या