🌟पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी झाले ९७.३१ टक्के मतदान....!


🌟शहरातील अभिनव शाळा व जिल्हा परिषद मध्यामिक शाळा ह्या दोन मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली🌟

पुर्णा (दि.२८ एप्रिल) - पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीसाठी आज शुक्रवार दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या मतदान प्रक्रियेत एकून १६३८ पैकी १५९४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून या मतदान प्रक्रियेत सरासरी ९७.३१ टक्के मतदान झाले आहे. 

पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आज शुक्रवारी झालेल्या मतदान प्रक्रियेत सहकारी संस्थे मतदार संघातून ६४४ मतदारांपैकी ६३४ मतदारांनी तर ग्रामपंचायत मतदार संघातून ४६७ मतदारांपैकी ४६३ तर व्यापारी मतदार संघातून ३२१ पेकी ३०५ मतदारांनी तर हमाल मापाडी मतदार संघातील २०६ पैकी १९१ मतरांनी मतदानाचा हक्क बजावला असून पूर्णा शहरातील अभिनव शाळा व जिल्हा परिषद मध्यामिक शाळा ह्या दोन मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीची मतदान प्रक्रिया एकंदर आज शांततेत पार पडली आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या