🌟पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न...!


🌟या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुरेश तातेरावजी बोकारे उपस्थित होते🌟

पुर्णा (दि.०९ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 3 एप्रिल 2023 सोमवार रोजी घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुरेश तातेरावजी बोकारे व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विठ्ठलरावजी भुसारे शिक्षण अधिकारी प्राथमिक  जिल्हा परिषद परभणी हे उपस्थित होते.

 या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तानाजी बिरादार यांनी केले या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक गीते देशभक्तीपर गीते स्वच्छतेचे महत्व सांगणारी गीते प्लास्टिक बंदी करा असे समाज प्रबोधन करणारे गीतांच्या माध्यमातून एकतेचा संदेश देणाऱ्या गीतांवर मुलांनी सुंदर डान्स सादर केला या कार्यक्रमासाठी सर्व रसिक प्रेमींची उपस्थिती होती सर्व तरुण मंडळी . शिक्षण प्रेमींनी भरभरून मदत केली तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी बिरादार सर व सर्व सहकारी शिक्षक श्री झळके सर श्री सोनकांबळे सर श्री लठाड सर श्री खंदारे सर श्री गवळी सर यांनी या कार्यक्रमास खूप असे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून खूप असे मोलाचे परिश्रम घेतले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती खूप मोलाची लाभली त्यामध्ये डॉ.दिलीप शृंगार पुतळे,सुधीर कराळे,गोविंद नलबलवार,श्री.गायकवाड,रावसाहेब उगले,अबनराव पारवे,विठ्ठलराव भोसले,मूकमोड अण्णा,खिल्लारे नाना,श्री कुलकर्णी या सर्व मान्यवरांची उपस्थिती खूप मोलाची आहे व यांच्याकडूनही खूप काही शिकावयासारखे आहे असे श्री.गवळी  यांनी व्यक्त केले 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साहेबराव गवळी सर यांनी केलं तर यांना सहकार्य म्हणून सोपान नवघरे सर व ज्ञानेश्वर बोकारे सर यांनी साथ देत कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रमेशरावजी लठार सर यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या