🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या....!


🌟दिल्लीच्या AIIMS मध्ये कोरोनाचा विस्फोट; अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ🌟

✍️ मोहन चौकेकर

* ७१ हजार जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणाली द्वारे नियुक्तीपत्रांचं वितरण

* काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिक्षेविरोधात दाखल केलेल्या याचिकेचा 20 एप्रिलला निकाल,सुरत जिल्हा सत्र न्यायालयात होणार सुनावणी

* एकनाथ शिंदे यांनी तुरुंगात जाण्याच्या भीतीनं बंड केले --- आदित्य ठाकरे ; आदित्य ठाकरे लहान आहेत त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

* आजच माझं भाकीत सांगतो की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार असल्यामुळे हे सरकार स्थिर ---- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

* शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालयांमध्ये अतिरिक्त रेडिओलॉजी सेवा कार्यान्व‍ित करावी - वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन

* बीबीसीविरोधात ईडीने फेमा कायद्याअंतर्गत दाखल केला गुन्हा, परकीय निधी स्वीकारताना नियमांचे उल्लंघन केल्याचा ईडीकडून आरोप

* शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उतरणार मैदानात,लवकरच राजकीय दौऱ्यांना नाशिक पासून सुरूवात करणार असल्याची माहीती  

* माजी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर जीएसटी पथकाची छापेमारी, कारखान्याचा केंद्रीय जीएसटी कर थकवल्याप्रकरणी छापा

* अभिनेता शाहरूख खानच्या आगामी 'डंकी'चा फर्स्ट लूक व्हायरल, शाहरूखसह अभिनेत्री तापसी पन्नू प्रमुख भूमिकेत असणार)

* मार्च तिमाहीत इन्फोसिसचा निव्वळ नफा वार्षिक 7.8 टक्क्यांनी वाढून 6,128 कोटी रुपयांवर पोहोचला

* नाशिकमध्ये अवकाळी पावसामुळे सहा दिवसात 23 हजार 699 हेक्टरवरील शेतीचे नुकसान

* वैवाहिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पोलीस दल बांधील: जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालय

* दिल्लीच्या AIIMS मध्ये कोरोनाचा विस्फोट; अनेक कर्मचारी पॉझिटिव्ह, आरोग्य विभागात खळबळ

* काँग्रेसकडून मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीची स्थापना; माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण अध्यक्ष

* 'येऊर जंगल वाचवा' मोहीम; येऊरमध्ये रात्री दहानंतर प्रवेशबंदी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कर्मचाऱ्यांना निर्देश

* राज्यभरातील मनरेगाच्या कामावर राज्यभरातील गटविकास अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा बहिष्कार ; ग्रामीण भागातील कामे खोळंबणार

* देशभरात लवकरच 31 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार: ऑगस्ट 2023 पर्यंत देशात एकूण 75 वंदे भारत ट्रेन धावणार, महाराष्ट्रात लवकरच सिकंदराबाद ते पुणे हि तिसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरु केली जाणार

* शेअर बाजार:  सेन्सेक्समध्ये 38 अंकांची वाढ होऊन 60,431.00 वर झाला बंद, तर निफ्टी 15 अंकांनी वधारत 17,828.00 वर झाला बंद 

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या