🌟परभणीत भगवान परशुराम जयंती निमित्त उद्या २३ एप्रिल रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन....!


🌟या शिबीरात शासकीय जिल्हा रुग्णालय,आयएमए संघटना तसेच ब्रह्मचिकित्सकांचे या शिबिरामध्ये सक्रिय योगदान असणार🌟

परभणी (दि.२२ एप्रिल) : परभणी येथील कौस्तुभ मंगल कार्यालयात उद्या रविवार दि.२३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८-३० वाजेच्या सुमारास अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाच्या वतीने भगवान परशुराम यांच्या जयंती निमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

               या आरोग्य शिबिरात अ‍ॅलोपॅथी, आयुर्वेदिक व होमिओपॅथी तसेच नॅचरोपॅथीचे नामांकित डॉक्टर, वैद्य तसेच वैद्यकीय प्रतिनिधी यांच्या वतीने मधुमेह, बीपी, हृदयविकार व इतर विकारांबाबतची तपासणी करण्यात येणार आहे. या शिबीरात शासकीय जिल्हा रुग्णालय, आयएमए संघटना तसेच ब्रह्मचिकित्सकांचे या शिबिरामध्ये सक्रिय योगदान असणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर विविध आजारासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात महिलांच्या स्तन कर्करोग तसेच इतर आजारा विषयी महिला डॉक्टरांकडून मार्गदर्शन होणार आहे. या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  ब्राह्मण महासंघाचे विलास कौसडीकर, जिल्हाध्यक्ष इंजि. शंकर आजेगावकर, दीपक कुलकर्णी, अजय हमदापुरकर, नवनीत पाचपोर, गजानन खळीकर, उपेंद्र दुधगावकर, महेश मंगरूळकर,  संजय जोशी वझरकर, भरत उपाध्ये, संजय कुलकर्णी, मंगेश रत्नपारखी, विशाल भारस्वाडकर, संजय वाघ, गिरीश कस्तुरे, हेमंत धर्माधिकारी, दीपक कासंडे, महेश पारवेकर, कौशिक देशपांडे, मंगेश जवळेकर, प्रशांत चौधरी, श्रीधर कारेगावकर, श्रीधर कुलकर्णी आदींनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या