🌟आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीवर रासपचा ध्वज फडकवण्याची केली भिष्म प्रतिज्ञा🌟
पालम (दि.01 एप्रिल) : पालम कृषी उत्पन्न बाजार समिती विकासापासून कोसोदूर राहिली असून या निवडणूकीच्या माध्यमातून यश पटकावून बाजार समितीच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने सर्वार्थाने प्रयत्न केले जातील, असे ठोस आश्वासनआमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी दिले.
या बाजार समितीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज शनिवार दि.01 एप्रिल रोजी महात्मा गांधी विद्यालयात आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रासपचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक गणेशराव रोकडे अध्यक्षस्थानी तर व्यासपीठावर रासपचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप अळनूरे, गुट्टे मित्रमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, प्रभारी माधवराव गायकवाड, तालुकाध्यक्ष बालासाहेब रोकडे, गटनेते उबेदखा पठाण, माजी उपनगराध्यक्ष असदखाँ पठाण, माजी सभापती माधवराव गिनगिने, शहराध्यक्ष अजीम पठाण, सभापती डॉ. रामराव उंदरे, गणेश हतीअंबीरे, नगरसेवक रहिमतुल्लाखाँ पठाण, भगवान सिरस्कर, गणेश घोरपडे आदी उपस्थित होते.
आगामी तीन महिन्यात पालमला शेतकरी भवन उभारले जाईल.पालमला उत्तम बाजारपेठ आहे. परंतु, अद्याप विकास झालेला नाही. प्रशस्त जागा नाही. बाजारपेठेत आपणास जागा उपलब्ध करून द्यावी, तिथे भव्य मार्केट उभे करून देवू. त्याठिकाणी सर्व आधुनिक सुविधा शेतकरी आणि व्यापार्यांसाठी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन डॉ. गुट्टे यांनी दिले. श्री. रोकडे यांनी बाजार समिती निवडणूक पूर्ण ताकदीने लढविण्याचा निर्धार केला. तालुक्यातील शेतकर्यांना बाजार समितीकडून सर्व सुविधा दिल्या जातील. त्यात शेतमालास रास्तभाव देण्यापासून ते शेतकर्यांच्या कॅन्टींगपर्यंतच्या सुविधांचा समावेश असेल,असे रोकडे म्हणाले...
0 टिप्पण्या