🌟महात्मा फुले सर्व प्रकारच्या गुलामीचे मुक्ती दाते - कॉम्रेड राजन क्षीरसागर


🔹गंगाखेड येथे जयंती महोत्सव उत्साहात 🔹

गंगाखेड (दि.१२ एप्रिल) : महात्मा फुले हे सत्यशोधक होते. कर्ते समाजसुधारक होते. गुलामगीरीत खीतपत पडलेल्या प्रत्येक घटकाला गुलामगीरीतून मुक्त करण्याचे महान कार्य त्यांनी केले. म्हणून दोनशे वर्षांनंतरही त्यांचे विचार स्वीकारार्ह आहेत, असे प्रतिपादन कॉम्रेड राजन क्षीरसागर यांनी केले. 


गंगाखेड येथे आयोजीत सार्वजनिक जयंती महोत्सवात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव हे होते. विचारमंचावर शिक्षक सेनेचे सरचिटणीस बाळासाहेब राखे, भाकपचे ओंकार पवार, गोविंदराव कदम सर, पत्रकार गुणवंत कांबळे, शिवकन्या शिंदे, योगेश फड, सागर गोरे यांची ऊपस्थिती होती. 

याप्रसंगी बोलताना राजन क्षीरसागर यांनी महात्मा फुले यांनी विविध घटकांसाठी केलेल्या कार्याचा ऊल्लेख केला. बहुजन शिक्षण, स्त्री शिक्षण, शेतकरी, बालविधवा आदिंसाठी त्यांचे असलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगून फुले यांच्या विचारांची आजही खरी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आपल्या अध्यक्षीय समारोपात गोविंद यादव यांनी महात्मा फुले यांच्यामुळेच बहुजन, स्त्रीया शिक्षणात पुढे आल्या परंतू या सर्वांना फुले दापंत्याच्या कार्याचा, त्यागाचा विसर पडल्याची खंत व्यक्त केली. तसेच आगामी काळात फुले-आंबेडकर जयंती संयुक्तपणे साजरी करण्याचा मनोदय या प्रसंगी बोलताना व्यक्त केला. बाळासाहेब राखे, ओंकार पवार, गुणवंत कांबळे, बालवक्त्या शिवकन्या शिंदे यांची समायोचीत भाषणे झाली. 

कार्यक्रमाचे प्रास्तावीक सागर गोरे, सुत्रसंचालन योगेश फड यांनी तर आभारप्रदर्शन रोहीदास लांडगे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आबासाहेब शिंदे, स्वप्नील गिराम, अभीषेक यादव, अशोक राष्ट्रकुट, भागवत यादव आदिंनी परीश्रम घेतले. 

* पेठशिवणीत रक्तदान शिबिर :-


पालम तालुक्यातील पेठशिवणी येथे महात्मा फुले जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. कॉंग्रेसचे गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांच्या हस्ते या शिबीरीचे ऊद्घाटन झाले. सावता परिषदेचे पालम तालुकाध्यक्ष दत्तराम शिंदे, विलास चव्हाण, मंचकराव शिनगारे, दत्ता डोके, कपील शेटे, प्रभू गोरे आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. 

येथील सावता माळी मंदिरात संपन्न झालेल्या शिबिरात बहुसंख्य युवकांनी रक्तदान केले. नांदेड येथील जीवन आधार रक्त पेढीचे साइनाथ चौधरी व त्यांच्या सहकार्यांनी रक्त संकलीत करून तांत्रीक बाबी सांभाळल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या