🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - पुर्णा सिटी टॉप १० न्युज : पुर्णा शहरातील महत्वाच्या दहा बातम्या....!


🌟पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांची लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे बदली🌟

१) पुर्णा तालुक्यातील चुडावा येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दि.२१ एप्रिल रोजी  रास्ता रोको आंदोलन : पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आले निवेदन.

२) पुर्णा शहरातील अमृत नगर येथील श्री.स्वामी समर्थ केंद्रात श्री स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न : रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

३) पूर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांची लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे बदली : चाकूर नगर पंचायत मुख्याधिकारी पदाचा स्वीकारला पदभार : बदलीचा आदेश प्राप्त होताच दि.१७ एप्रिल २०२३ रोजी रात्री ०९-१५ वाजता नगर परिषद कार्यालयात उपस्थित राहून मुख्याधिकारी नरळे यांनी शहरातील निकृष्ट व बोगस विकास कामाच्या देयकांवर केली स्वाक्षरी 

४) पुर्णा शहरातील शांतीनगर येथे छत्रपती संभाजी नगर येथील भिक्खू ज्ञानरक्षीत थेरो यांच्या विशेष प्रवचनाच्या कार्यक्रमाचे आयोजन.

५) श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त वाचन संस्कृती जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पाच तास अभ्यास करून केले महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन.

६) पुर्णा शहरासह तालुक्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे पुर्णा शहरातील व्यापारपेठेत शुकशुकाट : व्यापार ठप्प.

७) पुर्णा तालुक्यातील पुर्णा-गोदावरी नदीपात्रातील गौण खनिज रेतीचे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर उत्खननासह असंख्य वाहनांतून चोरट्या रेतीची तस्करी : तहसिलदार माधवराव बोथीकर लक्ष देतील काय ? पुर्णेकरांचा खडा सवाल.

८) पुर्णेतील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या जागेचा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातच ? तहसिल प्रशासनाला सर्वे नंबर १४ या गायरान जमीनीतील उर्वरीत जमीन शोधून मिळता मिळेना.

९) पुर्णा शहरासह तालुक्यात सर्वत्र मोकाट जनावरांचा धुमाकूळ : शहरातील बाजारपेठेत मोकाट गाई वळूंसह गाढवांच्या झुंडींमुळे नागरिकांसह अबालवृध्दांना रस्त्यावरून चालने झाले मुश्कील.

१०) पुर्णेतील पुर्णा-नांदेड लोहमार्गावरील पुलाखालच्या भुयारी मार्गात पाणी जमा होत असल्याने या भुयारी मार्गावर थातुरमाथूर सिमेंट गिट्टी रेतीचा थर अंथरून रेल्वे प्रशासनाकडून गुत्तेदाराने केले लाखो रुपयांचे बिल बसूल,  टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या