🌟महिला उन्नती संस्था (भारत) च्या मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी मदन (बापू)कोल्हे यांची निवड...!


🌟संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रीदेवी पाटील यांनी मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे🌟

परभणी (दि.२५ एप्रिल) - सामाजिक बांधिलकी पत्करून, सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम संपूर्ण हयात घालविणारे, परभणी येथील ज्येष्ठ पत्रकार मदन बापू कोल्हे यांची ,राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या महिला उन्नती संस्था (भारत) नवी दिल्ली या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रीदेवी पाटील यांनी मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. या पुर्वी मदन कोल्हे यांनी विविध सामाजिक व पत्रकारांच्या विविध संघटना मध्ये आपले भरीव योगदान दिलेले असुन त्यांना समाजभूषण, राष्टरपिता महात्मा गांधी पुरस्कार महाराष्ट्र रत्न,जिवन गौरव आदी पुरस्कारांने विविध संस्था तर्फे गौररविण्यात आलेले आहे.

परभणी, नांदेड, हिंगोली व लातुर या जिल्ह्मामध्ये विविध सामाजिक व पत्रकारांच्या संघटना द्वारे केलेल्या कार्याबरोबरच महिलांच्या सर्वागीण उन्नतीसाठी, महिला बचत गटाच्या माध्यमातून मदन बापू कोल्हे यांनी केलेल्या उल्लेखनिय कार्याची दखल घेऊन, देशात नावलौकिक मिळवलेल्या महिला उन्नती संस्थेचे राष्ट्रय अध्यक्ष डॉ.राहुल वर्मा यांचे मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रचे संघटक संजय कुमार कोटेचा यांनी, गेली ५२ वर्षापासून ' मानवता 'धर्म ळित 'धर्मभूमी' या वृत्तपत्राचे माध्यमांद्वारे कार्य करणारे मदन बापू कोल्हे यांचे वर मराठवाड़ा विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.ही नियुक्ती केल्याबद्दल मदन कोल्हे यांनी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रीदेवी पाटील व महाराष्ट्राचे संघटक संजय कुमार कोटेचा यांचे आभार मानले आहेत. मदन कोल्हे यांच्या वरील निवडीचे स्वागत होत असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या