🌟पुर्णा नगर परिषदे अंतर्गत होणाऱ्या कोट्यावधी रुपयांच्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुकसंमती....!


🌟कोट्यावधींचा शासकीय विकासनिधी गिळण्याची भ्रष्ट गुत्तेदार तत्वभ्रष्ट लोकप्रतिनिधी अन् बेईमान अधिकाऱ्यांची निती🌟   


पुर्णा (दि.१७ एप्रिल) - 'तुम्ही करा वटवट अन् मी हाय निगरगट्ट' या तत्वाचा अवलंब करीत शहरातील विविध प्रभागांमध्ये चालत असलेल्या निकृष्ट दर्जाच्या बोगस कामांकडे दुर्लक्ष करीत आलेल्या तक्रारींसह प्रसार माध्यमांनी प्रसारीत केलेल्या वृत्तांना देखील नजरअंदाज करीत भ्रष्ट गुत्तेदारांना निकृष्ट दर्जाची कामे करुन कोट्यावधी रुपयांच्या शासकीय विकासनिधीची उधळण करण्यास संपूर्णपणे खुलीसुट देण्याचा निर्लज्जपणा पुर्णा नगर परिषद करीत असल्यामुळे शहरात सर्वत्र निकृष्ट व बोगस विकासकाम करण्याचा जणूकाही सपाटाच सुरु झाल्याचे पाहावयास मिळत आहे.    


[पुर्णा शहरातील प्रभाग ०२ मधील गळळी गल्लीच्या उर्वरीत भागात अश्या प्रकारे बोगस व निकृष्ट दर्जाची विकासकाम केली जात आहे]


पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे,प्रभारी नगर अभियंता (संगणक अभियंता) सिध्दार्थ गायकवाड आणि सब ओव्हरसिअर संजय दिपके व भ्रष्ट गुत्तेदार आजी/माजी लोकप्रतिनिधी यांची जणूकाही वज्रमुठच तयार झाल्याची पहावयास मिळत आहे सबओव्हरसिअर यांनी तर जणूकाही बोगस व निकृष्ट विकासकामांवर पिएचडीच केली की काय ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे लोकसभा/विधासभा/विधान परिषद/राज्यसभा सदस्यांसह विविध योजनांतील शासकीय विकासनिधींची सोईस्कररित्या वाट लावून स्वतःच्या सात पिढ्यांसाठी सोन्याच्या ताटासह सोनेरी घासाची व्यवस्था करतांना आपण जनसामान्यांना कोट्यावधी रुपयांचा शासकी विकासनिधी आल्यानंतर देखील विकासापासून वंचित ठेवीत आहोत याचे देखील या निर्लज्जांना भान राहिल्याचे दिसत आहे.

परभणी-हिंगोली विधान परिषदेचे विद्यमान आमदार आमदार बजोरीया यांच्या विशेष विकास निधीतून शहरातील प्रभाग क्रमांक ०१ मधील गवळी गल्ली,प्रभाग क्रमांक ०२ मधील गवळी गल्लीचा उर्वरीत भाग,प्रभाग क्रमांक ०६ मधील कुंभार गल्ली परिसरातील काली माता मंदिर परिसर व मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमी परिसरात तसेच प्रभाग क्रमांक ०७ मधील संपूर्ण विजय नगर येथे कोट्यावधी रुपयांच्या विकासनिधीतून अत्यंत निकृष्ट दर्जाच्या सिमेंट रोडसह सिमेंट नाल्यांच्या कामाचा अक्षरशः धडाकाच सुरु असून या अत्यंत निकृष्ट आणी बोगस कामांकडे मुख्याधिकारी नरळे,प्रभारी नगर अभियंता गायकवाड,सब ओव्हरसिअर दिपके हे जाणीवपूर्वक स्वतःचे हितसंबंध जोपासत दुर्लक्ष करीत असल्यामुळे संबंधित अधिकारी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेत आहेत की काय ? असा प्रश्न परिसरातील नागरिकांतून उपस्थित होत आहे.

शहराती प्रभाग क्रमांक ०१ मध्ये विधान परिषदेचे आमदार बजोरीया यांच्या लाखो रुपयांच्या विशेष विकासनिधीतून परिसरातील रफीक यांच्या घरा पासून ते सिकंदर यांच्या घरा पर्यंत सिमेंट रस्त्यासह नालीचे बांधकाम चालू असून या कामाचा दर्जा तपासल्यास असे निदर्शनास येईल की संबंधित गुत्तेदार शासकीय विकासनिधीची अक्षरशः धुळधान करीत आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचे नियमबाह्य पध्दतीने सिमेंट रोड व नालीचे बांधकाम होत असतांना नगर परिषद प्रशासनातील संबंधित अधिकारी आओ चोरो बांधो भारा आधा हमारा आधा तुम्हारा सब मिलकर करेंगे थोडा थोडा बटवारा ?' या पध्दतीने कारभार चालवत असल्यामुळे शहरवासीयांमध्ये संताप व्यक्त होत आहे.....     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या