🌟रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांसंदर्भात उद्घोषण करतेवेळी औरंगाबाद ऐवजी छ.संभाजी नगर उल्लेख करावा...!


🌟भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाचे परभणी रेल्वे स्थानक प्रबंधकाला साकडे🌟

परभणी (दि.१९ एप्रिल) : परभणी रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्यांसंदर्भात उद्घोषण करतेवेळी रेल्वे प्रशासनाने औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर असा नामोल्लेख करावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी केली.

              भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष कुलकर्णी, कामगार आघाडीचे सरचिटणीस मनोज देशमुख यांनी परभणी रेल्वेस्थानकावरील प्रबंधकांची भेट घेतली. त्यातून रेल्वे स्थानकावरील चूकीच्या उद्घोषणाबद्दल निवेदन सादर केले. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक व अन्य माहिती देतेवेळी औरंगाबाद नावाचाच सातत्याने नामोल्लेख होतो आहे. औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजी नगर या नावाची अधिकृत घोषणा होवूनसुध्दा औरंगाबाद असाच उल्लेख होतो आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या आत औरंगाबाद असा उल्लेख करण्याऐवजी छत्रपती संभाजी नगर असाच नामोल्लेख झाला पाहिजे,असे जिल्हा उपाध्यक्ष कुलकर्णी यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या