🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स : मागील चोवीस तासातील महत्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/बातम्या.....!


🌟मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्याहून परतताच पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर🌟 

 ✍️ मोहन चौकेकर

 * निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादीचे शरद पवार यांना मोठा झटका, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसह टीएमसी, सीपीआयचाही  राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द 

* नवीन शैक्षणिक धोरण येत्या शैक्षणिक वर्षापासून लागू होणार; शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांची माहिती; आता 5+3+3+4 अशी नवी व्यवस्था लागू होणार

* अग्निपथ योजनेच्या वैधतेवर सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब; उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दाखल केलेल्या 2 याचिका फेटाळल्या

* ट्विटरचे सीईओ इलाॅन मस्क यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले फाॅलो, मस्क यांनी आतापर्यंत 194 जणांना ट्विटरवर केले फाॅलो

* Coronavirus: कोरोनाचा आलेख चढताच; देशात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद, सक्रिय रुग्णसंख्या 35109 वर

* सीईटीसाठी पीसीबी ग्रुपसाठी 2 लाख 95 हजार 844 आणि पीसीएम ग्रुपसाठी 3 लाख 23 हजार 189 विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

* अकोल्यामधील मंदिराच्या शेडवर झाड कोसळून 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यूप्रकरणी मदत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर

* कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात नंदिनी विरुद्ध अमूल असा दुधाचा वाद पेटला, नंदिनी कर्नाटकातील तर अमूल गुजरातचा ब्रँड

* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्याहून परतताच पोहचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर केला नाशिकमधील नुकसानग्रस्त भागाचा दौरा 

* गारपीटीचा महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यांना तडाखा; नाशिक संभाजीनगर, बीडसह हिंगोली जिल्ह्याला मोठा फटका राज्यात परत पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज,विजांच्या कडकडाटासह पुन्हा गारपिटीची शक्यता 

* बैलगाडा शर्यतीत रुस्तूम-ए-हिंदचा किताब बकासुर महिब्यांने मिळवला 

* एकाच षटकात 5 सिक्स मारणारा रिंकु सिंह पुर्वी कोचिंग सेंटरमध्ये लादी पुसण्याचे   काम करायचा , आता झाला रातोरात सुपरस्टार सर्वच ठिकाणी त्याचीच चर्चा

* विनायक ग्रुप प्रकरण : आमदार अबू आझमींच्या अडचणीत वाढ; आयकर विभागाकडून चौकशीचे समन्स, 160 कोटी टॅक्स चोरीचा आरोप

* अकोल्यामधील एका मंदिराच्या शेडवर झाड कोसळून 7 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाखांची मदत तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार होणार असल्याचे केले जाहीर

* 'किसी का भाई, किसी की जान' चा ट्रेलर रिलीज : अभिनेता सलमान खानचा 'किसी का भाई, किसी की जान' हा चित्रपट 21 एप्रिलला होणार रिलीज; सलमान खान, पूजा हेगडे, दाक्षिणात्य स्टार व्यंकटेश यांच्या प्रमुख भूमिका 

* सीईटी : सीईटीसाठी विक्रमी 6 लाख 20 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी, यामध्ये पीसीबी ग्रुपसाठी 2 लाख 95 हजार 844 आणि पीसीएम ग्रुपसाठी 3 लाख 23 हजार 189 विद्यार्थ्यांनी नोंदणी

* शेअर बाजार : सेन्सेक्समध्ये 13 अंकांची वाढ होऊन 59,846.51 वर झाला बंद, तर निफ्टी 24 अंकांनी वधारत 17,624.05 वर झाला बंद

* सोन्याचे आजचे दर : मुंबईत 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रती 10 ग्रॅमसाठी 55400 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचे भाव 60430 रुपये 

* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे प्रकरण पुन्हा लांबणीवर :-

सुप्रीम कोर्टात आजही सुनावणी नाही.महाराष्ट्र सरकारने आज काही वेळ मागितला. त्यानंतर प्रकरण 3 आठवड्यासाठी लांबणीवर,मुंबई पुणेसह 25 महानगरपालिका 25 जिल्हा परिषद 207 नगरपालिका निवडणुका पुन्हा अधांतरी

*शिवसेना भवन : पक्षाची संपत्ती ही ज्याचा पक्ष त्यालाच मिळायला हवी अँडव्होकेट आशिष गिरी यांची सुप्रीम कोर्टात जनहित याचिका,मतदार म्हणून याचिका दाखल या याचिकेशी आमचा काहीही संबंध नसल्याचं शिंदे गटाचं म्हणणं : 24 एप्रिलला चिन्हवाटपाबाबत पुढची सुनावणी, तेव्हा याचिका ऐकण्याची विनंती

* गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे 5,880 नवीन रुग्ण सापडले : कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात कोरोनाचे 5,880 नवीन रुग्ण सापडले असून एकूण १४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच सक्रिय रुग्णांची संख्या 35,199 झाली आहे.

* शरद पवारांचा अदानी व सावरकरांचा मुद्दा या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा :-

सावरकरांचा मुद्दा,अदाणी प्रकरण, मोदींची डिग्री यात शरद पवार यांनी कुठेतरी भाजपला पाठिंबा दिल्याचं पहायला मिळालं. मात्र त्यामूळे मविआत मतभेद निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

"अख्खं सरकार देवाच्या दर्शनासाठी जातंय हा प्रकार पहिल्यांदाच दिसतो." - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

* पृथ्वीराज चव्हाण जेपिसीबाबत अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य :-

यापूर्वी स्वतः स्व. राजीव गांधी बोफोर्स आरोपांवरून जेपीसीला सामोरे गेले होते. हर्षद मेहता आणि केतन पारेख यांच्या घोटाळ्यांची उकल जेपीसीमुळे शक्य झाली.

२००३ साली शीतपेयांमध्ये कीटकनाशकांचा अंश आहे असे आरोप देशात झाले तेव्हा एक जेपीसी स्थापन झाली होती.त्या जेपीसीने अत्यंत चौकसपणे सत्यशोधन केलं आणि त्याचा परिणाम म्हणून शीतपेयांच्या निर्मितीसाठी जगातील सर्वांत कठोर नियमावली भारताने तयार केली. शरद पवार साहेबांनी त्यावेळी त्या जेपीसीचे नेतृत्व केले होते.

* अजित पवार यांची गणना अंधभक्तात होऊ नये असं वाटतं -- संजय राऊत.*

"अजित पवार यांना ईव्हीएमवर विश्वास असेल तर असू द्या. पण देशातील जनतेला नाही. जे भाजपचे भक्त आणि अंधभक्त आहेत त्यांचा ईव्हीएमवर विश्वास आहे.अजित पवार यांची गणना अंधभक्तात होऊ नये असं वाटतं."असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.                                                      

✍️मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या