🌟 जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - महत्वाच्या टॉप टेन न्युज...!


🌟धोनी,युवराज,रैना,गोस्वामी,मिताली राज हे टीम इंडियाचे पाच माजी क्रिकेटपटू बनले आजीवन सदस्य🌟

1️⃣ खुशखबर : गृह मंत्रालयाने CRPF मध्ये कॉन्स्टेबलच्या सुमारे 1.30 लाख पदांच्या भरतीसाठी अधिसूचना केली जारी

2️⃣ जपानचे लष्करी हेलिकॉप्टर बेपत्ता: ब्लॅक हॉक चॉपरमध्ये होते 10 जण, शोध सुरू; चीन व उत्तर कोरियावर संशय

3️⃣ नायब तहसीलदार, तहसीलदार आणि प्रांत अधिकाऱ्यांच्या संघटनेने आज संप घेतला मागे, नायब तहसीलदारांची वेतनश्रेणी 4,800 रुपये करण्याचा निर्णय

4️⃣ रेपो दर 6.50 टक्क्यांवर कायम, रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची घोषणा

5️⃣ धोनी, युवराज, रैना, गोस्वामी, मिताली राज हे टीम इंडियाचे पाच माजी क्रिकेटपटू बनले आजीवन सदस्य, मेरिलबोन क्रिकेट क्लबकडून मोठी घोषणा

6️⃣  पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी, पुणे-बंगळूर महामार्गावरील चांदणी चौकातील वाहतूक 10 एप्रिलपासून राहणार बंद

7️⃣ मुंबईत आज 22 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर  55900 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचे प्रती 10 ग्रॅमसाठीचे दर 60980 रुपये

8️⃣ नांदेडमधील मुदखेड तालुक्यात झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मदत, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

9️⃣ अचलपूरची ‘फिन्ले मिल्स’ सुरू करण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेणार - वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

🔟 शेअर बाजार: सेन्सेक्स 143 अंकांची वाढ होऊन 59,832.97 वर बंद, तर निफ्टी 42 अंकांची वाढ होऊन 17,599.15 वर बंदटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या