🌟पुर्णा जंक्शन येथील डिझेल चोरी प्रकरण : पत्रकाराने निदर्शनास आणून दिल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाला आली जाग....!


🌟चोरट्या डिझेलच्या चार बॅरलसह दोन खाजगी वाहन रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात : रेल्वे अधिकारी/कर्मचारी संशयाच्या जाळ्यात🌟 

 


पुर्णा (दि.२८ एप्रिल) - पुर्णा रेल्वे जंक्शन येथील रेल्वेच्या डिझेलचा काळाकारभार मागील अनेक वर्षापासून सातत्याने चालत असल्याचे कुणकूण रेल्वे कर्मचाऱ्यांतूनच ऐकावयास मिळत होती परंतु 'चोर चोर मौसेरे भाई' अश्या पध्दतीने एकमेकांना सांभाळून घेण्याचा प्रताप मागील अनेक वर्षापासून सुरळीतपणे चालला होता परंतु दि.२६ एप्रिल २०२३ रोजी १०-०० ते १०-३० वाजेच्या सुमारास शेजारील तेलंगाना (आंध्र प्रदेश) राज्यातील आयशर ट्रक क्र.एपी २७ डब्लू ६८२९ हे वाहन आरआरसी ग्राऊंड समोर संशयास्पदरित्या उभे असल्याचे व त्यात चार ते पाच बॅरल डिझेलचे भरलेले असल्याचे पत्रकार दिपक साळवे यांना निदर्शनास आले यावेळी त्यांनी तात्काळ घटनास्थळावर आलेले पत्रकार सुशिल गायकवाड यांनी चौकशी करीत त्या आयशर ट्रकची विडिओ शुटींग घेण्यास सुरुवात केली असता ही बाब रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना निदर्शनास आली त्यांनी तात्काळ धावत येवून पत्रकार साळवे यांना मज्जाव केला व वाहन ताब्यात घेऊन रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयाच्या मागील बाजूस नेऊन लावला व आम्ही पुढील कारवाई केल्यानंतर आपणास माहिती देऊ असे म्हणून पत्रकारां समोर कारवाईनाट्य रंगवल्याने शंकेची पाल चुकचुकतांना दिसत आहे.    


पुर्णा रेल्वे जंक्शन येथील डिझेल घोटाळ्याची उच्चस्तरीय समिती मार्फत सखोल चौकशी केल्यास या प्रकरणात बरेच मोठे अधिकारी/कर्मचारी अडकण्याची शक्यता असल्याचे रेल्वे कर्मचारी सुत्रांकडून समजते आतापर्यंत रेल्वेचे डिझेल चोरीकरीत किती डिझेलची वाट लावण्यात आली याचा सखोल तपास होण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे दरम्यान आतापर्यंत किती खाजगी वाहनधारकांसह पेट्रोल/डिझेल विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात डिझेल साठ्याचा पुरवठा करण्यात आला याचे गुढ कायम असून या बाबत रेल्वे परिसरात उलट सुलट चर्चेला उद्यान आले आहे.

पुर्णा रेल्वे स्थानक हे मराठवाड्यातील दक्षिण मध्य रेल्वेचे सर्वात मोठे जंक्शन असल्यामुळे या ठिकाणी रेल्वेचे डिझेल डिपो आहे पूर्णेतुनच प्रत्येक रेल्वेच्या इंजिन मध्ये डिझेल भरले जाते परंतु सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन कार्यालयाला सिकंद्राबाद डिव्हिजन येथून डिझेल साठा पुरवला जात असल्याचे समजते दि.२६ एप्रिल २०२३ रोजी रात्री खाजगी आयशर ट्रक क्रमांक ए.पी.२७ डब्लू ६८२९ हा आरआरसी ग्राऊंड येथून तर बोलोरी पिकप् जिप ज्या वर भारत सरकार असे नाव लिहिलेले असून जिचा क्रमांक एम.एच.२६ बी.ई.१९४८ ही दि.२७ एप्रिल २०२३ रोजी सिग्नल अँड टेलीकम्युनिकेशन कार्यालया समोरुन चोरट्यां डिझेलसह ताब्यात घेण्यात आली यास जागृक नागरिक पत्रकाराची जागृकता कारणीभूत असली तरी रेल्वे सुरक्षा बलाकडून संबंधित वाहन अनधिकृत रित्या रेल्वेचे डिझेल भरताना रंगेहात पकडले गेल्याचे सांगत आहेत मग सदरील वाहनांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात डिझेल भरतांना संबंधित रेल्वे अधिकारी/कर्मचारी झोपेत होते काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असून हा प्रकार रेल्वे अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या संमती शिवाय झाला असेल काय ? रेसुबने दोन्ही वाहन चालकांसह ताब्यात घेतल्याचे नाट्य रंगवून त्यांच्याकडून या प्रकरणात ८३७०/- रुपयांचे डिझेल जब्त केल्याचे दाखवत चालक रब्बानी पठाण व जिप चालकाला ताब्यात घेऊन सोपस्कार पुर्ण करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन यातील खऱ्या डिझेल घोटाळेबाजांना वाचवण्याचा गंभीर प्रकार होत असल्याचे बोलले जात आहे या प्रकरणाची सखोल चौकशी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी किंवा सिबीआय कडून करण्यात आल्यास डिझेलचा फार मोठा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेल्वेचे डिझेल खाजगी वाहनात आढळून आल्याने एसएनटीचे अधिकारी (एसएससी) कृष्णप्रसाद यांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दम्यान या प्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाचे पो.नि.अमित्तकुमार झा यांच्या मार्गदर्शनाखाली सहय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश चव्हाण,पि.व्ही.गवडे यांनी कारवाई केली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या