🌟पुर्णेत महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त भव्य मिरवणुक संपन्न : हजारो लिंगायत समाज बांधवांनी केले बसवेश्वरांना अभिवादन...!


🌟श्री गुरु बुध्दिस्वामी मठातून निघालेल्या शिस्तबध्द मिरवणुकीत महात्मा बसवेश्वर यांचा गगनभेदी जयघोष🌟


पुर्णा (दि.२२ एप्रिल) - लिंगायत धर्म संस्थापक १२ व्या शतकातील थोर समाज सुधारक महामानव लोकशाहीचे जनक समतानायक क्रांतिसूर्य जगातील प्रथम संसद निर्माते इष्टलिंग जनक अहिंसावादी अंधश्रद्धा व कर्मकांड विरोधक वैद्यानिक दृष्टिकोन असणारे महामानव महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आज शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९-०० वाजेच्या सुमारास पुर्णेतील ग्रामदैवत श्री गुरु बुध्दिस्वामी मठ संस्थान येथुन महात्मा बसवेश्वर यांच्या भव्य जयंती महोत्सव शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.


पुर्णा शहरातील श्री.गुरुबुध्दी मठ संस्थान येथुन निघालेल्या शिस्तबध्द शोभा यात्रेत महात्मा बसवेश्वर यांच्या गगनभेदी जयघोष करीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात म.बसवेश्वर जयंती महोत्सव सोहळा पार पडला या मिरवणुकीत लिंगायत समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोदवला यावेळी महात्मा बसवेश्वर जयंती महोत्सव समितीच्या वतीने शहरातील सर्वच महापुरुषांना अभिवादन करण्यात आले या मिरवणूकीत लिंगायत समाजाचे नेते तथा पुर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा.संचालक व श्री.गुरु बुध्दीस्वामी महाविद्यालयाचे अध्यक्ष प्रमोद सितारामअप्पा एकलारे,शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम,शिवसेना नेते तथा नगराध्यक्षा गंगाबाई एकलारे यांची प्रतिनिधी मा.नगरसेवक संतोष एकलारे,नगरसेवक ॲड.राजेश विष्णुकांत भालेराव,भाजपाचे भारत एकलारे,नगरसेवक ॲड.हर्षवर्धन गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, नगराध्यक्ष प्रतिनिधी संतोष एकलारे,नगरसेवक शाम कदम नगरसेवक बंटी कदम,समाजसेवक दादाराव पंडित,भाजपचे डॉ अजय ठाकूर, बाळासाहेब कदम,विनय कऱ्हाड,महेष कापसे आदींसह शंकर गलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मिरवणूक महात्मा बसवेश्वर चौकात आल्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले सर्वांनी रमजान ईद,महात्मा बसवेश्वर जयंती व भगवान परशुराम जयंती तसेच अक्षय तृतीया निमित्त तमाम पुर्णेकरांना हार्दिक शुभेछा दिल्या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन जयंती मंडळाच्या वतीने करण्यात आहे होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या