🌟पुर्णेत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध बौध्दीक,सांस्कृतिक कार्यक्रम......!


🌟महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव दिनी शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन🌟

पुर्णा (दि.१३ एप्रिल) - महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त पुर्णा शहरात शुक्रवार दि.०७ एप्रिल रोजी १८ तास अभ्यास अभियान, शनिवार ०८ एप्रिल रोजी निबंध स्पर्धा,रविवार दि.०९ एप्रिल रोजी वक्तृत्व स्पर्धा, सोमवार दि.१० एप्रिल रोजी रांगोळी स्पर्धा,मंगळवार दि.११ एप्रिल रोजी गीतगायन स्पर्धा,तसेच क्रांती सुर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची १९६ व्या जयंती निमित्त कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौध्द महासभेचे श्रीकांत हिवाळे,प्रमुख वक्ते व्यंकटराव कदम, माजी उपनगराध्यक्ष उत्तम खंदारे यांची उपस्थिती होती.तर उद्या शुक्रवार दि.१४ एप्रिल २०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी ०९-०० वाजता तहसीलदार माधवराव बोथीकर यांच्याहस्ते मुख्य ध्वजारोहण,रेल्वे स्टेशन येथे प्राचार्य राम धबाले यांच्याहस्ते,सकाळी १०-०० वाजता बुध्द विहार येथे भदन्त डॉ.उपगुप्त महाथेरो, शांती नगर येथे जयंती कार्याध्यक्ष प्रकाश कांबळे यांच्याहस्ते, ११.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे पुज्य भन्ते पय्यावंश यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर दुपारी १२-०० वाजता डॉ. आंबेडकर नगर येथुन महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक निघणार आहे.

यावेळी गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे,पुर्णा पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक सुभाषचंद्र मारकड,संतोष एकलारे, इंजी. सुनिल मोरलवार यांची प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थिती राहणार आहे. मंगळवार दि.१८ एप्रिल रोजी शांतीनगर येथे सायंकाळी ०६-०० वाजता पुज्य भदन्त ज्ञानरक्षीत थेरो यांची धम्मदेशना होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक अनिल खर्गखराटे यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच यावेळी भिक्खू बोधीधम्मा,भन्ते पय्यावंश, भन्ते संघरत्न यांची उपस्थिती राहणार आहे. बुधवार १९ एप्रिल रोजी संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तर शुक्रवार दि.२१ एप्रिल २०२३ रोजी प्रबोधनात्मक एकपात्री नाटक 'मी आंबेडकर बोलतोय' होणार आहे. सोमवार दि.२४ एप्रिल २०२३ रोजी विद्रोही आंबेडकरी शाहीरी जलसा होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे, तर शुक्रवार २८ एप्रिल रोजी संतोष जोंधळे यांच्या प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाचा जास्ती जास्त बौद्ध उपासक, उपासिका, नागरीकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या