🌟शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महाप्रबोधन यात्रा शुक्रवार दि.07 एप्रिल रोजी परभणीत....!🌟महात्मा फुले शाळेच्या मैदानावर आयोजित सभेसाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे - आ.डॉ.राहुल पाटील


परभणी (दि.05 एप्रिल) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची महाप्रबोधन यात्रा शुक्रवार दि.07 एप्रिल 2023 रोजी परभणी शहरात येत आहे. या यात्रे निमित्त येथील महात्मा फुले शाळेच्या मैदानावर आयोजित केलेल्या जाहीर सभेस शिवसैनिकांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन परभणी विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी केले आहे.

           यावेळी शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव,शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे,शिवसेना उपनेत्या ज्योतीताई ठाकरे, खासदार संजय जाधव,आमदार डॉ. राहुल पाटील यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार असून या जाहीर सभेस जिल्हा प्रमुख विशाल कदम,सुरेश ढगे आदींची उपस्थिती असणार आहे.

दरम्यान, या जाहीर सभेच्या तयारीसाठी आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात परभणी विधानसभा मतदार संघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार डॉ. राहूल पाटील म्हणाले की, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाचा वारसा चालवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवगर्जना यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे शिवसैनिकांत एक नवचैतन्य फुलले आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुरू केलेली महाप्रबोधन यात्रा शिवसैनिकांसाठी स्फूर्ती देणारे अभियान ठरत आहे. याच प्रबोधन यात्रेतील मेळावा शुक्रवारी परभणीत होत आहे. या जाहीर सभेला परभणी विधानसभा मतदार संघातील हजारो नागरीकांसह शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी, दलित आघाडी व संलग्न सर्व संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ.पाटील यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या