🌟परभणी जिल्हा बहुभाषीक पत्रकार संघांच्या अध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार तथा दै.लोकप्रश्नचे संपादक दिलीप माने यांची निवड....!


🌟तर जिल्हा कार्याध्यक्षपदी दै.सामनाचे निर्भिड पत्रकार सुरेश जंपनगीरे,जिल्हा उपाध्यक्षपदी दत्ता लाड यांची निवड🌟

परभणी (दि.०१ एप्रिल) - परभणी जिल्हा बहुभाषीक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकप्रश्नचे संपादक दिलीप माने यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी दैनिक सामना वर्तमान पत्राचे निर्भिड जिल्हा प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार सुरेश जंपनगिरे तर जिल्हा उपाध्यक्षपदी दैनिक पुण्य नगरी या आघाडीच्या वर्तमानपत्राचे दत्ता लाड यांची सर्वानुमते पुन्हा निवड करण्यात आली.

आज १ एप्रिल रोजी दै. आजचा लोकप्रश्न जिल्हा कार्यालयात पत्रकारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला बहुभाषीक पत्रकार संघाचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बहुभाषीक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार स्व. हमीद मलिक यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर जिल्हा व तालुक्यातील या संघटनेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. या बैठकीत बहुभाषीक पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. सन २०२३-२४ या कालावधीसाठी बहुभाषीक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दिलीप माने, उपाध्यक्षपदी दत्ता लाड तर कार्याध्यक्षपदी सुरेश जंपनिगरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांनी आपली प्रतिक्रीया देत सांगीतले की, येत्या काळात पत्रकारांच्या हिताचे निर्णय घेण्यात येतील. लवकरच तालुका पातळीवरील नवीन कार्यकारिणीही घोषीत करण्यात येणार आहे. शिवाय नव्याने पत्रकार नोंदणी चालू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या