🌟पुर्णेत आज दि.१० एप्रिल रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक...!


🌟पोलिस प्रशासनाच्या वतीने नगर परिषदेच्या राजमाता आहिल्यादेवी होळकर सभागृहात सकाळी ११-०० वाजता बैठकीचे आयोजन🌟

पुर्णा (दि.०९ एप्रिल) - पुर्णा पोलीस प्रशासनाच्या वतीने आज सोमवार दि.१० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११-०० वाजेच्या सुमारास येथील पुर्णा नगर परिषदेतील राजमाता आहिल्यादेवी होळकर सभागृहात महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.   

पुर्णा पोलिस प्रशासनाच्या वतीने सर्व शांतता समिती सदस्य नगरसेवक पत्रकार जेष्ठ नागरिक पोलीस पाटील सर्व मंडळाचे पदाधिकारी यांची शांतता बैठक नगर परिषद पूर्णा येथे आयोजित केली असून सदर बैठकीस माननीय अप्पर पोलीस अधिक्षक श्री काळे सर ,माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे साहेब ,तसेच उपविभागीय अधिकारी गंगाखेड श्री पाटील हे हजर राहणार असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन करणार आहेत तरी सदर बैठकीस वेळेवर न चुकता हजर राहावे असे आवाहन पो.नि.सुभाषचंद्र मारकड यांनी केले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या