🌟पुर्णा येथील बुद्ध विहार प्रबोधनाचे एक आदर्श केंद्र आहे....!


🌟पुर्णेचे तहसीलदार माधवराव बोथीकर यांचे प्रतिपादन🌟


पूर्णा (दि.07 एप्रिल) - पुर्णा येथील बुध्द विहार या ठिकाणी दि.06 एप्रिल 2023 रोजी चैत्र पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन अखिल भारतीय भिकू संघाचे महाराष्ट्र प्रदेश महासचिव डॉक्टर उपगुप्त महाथेरो , अजंठा धम्मा चल येथील भिक्खू बोधिधम्मा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पयावंश आम्रवन महाविहार सेलू येथील भंते संघरत्न यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बोधिसत्व डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेल्या महिला मंडळाकडून करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून नव्यानेच तहसीलदार पदाचा पदभार स्वीकारलेले माधवराव बोथी कर, पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयराम मोडके, पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांची उपस्थिती होती.


याप्रसंगी बुद्ध विहार समितीच्या वतीने सर्व अतिथींचा शाल पुष्पहार स्मृतीचिन्ह व स्मरणिका देऊन यथोचित सत्कार करण्यात आला उपस्थिताना संबोधित करताना पूर्णा तालुक्याचे तहसीलदार माधवराव बोथी कर यांनी भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध विहारांमध्ये समाजप्रबोधनाचे जे कार्य चालू आहे त्यामधून माझ्यासारख्या अधिकाऱ्यांना प्रेरणा मिळते नितिमत्ता व सदाचाराचे धडे मिळतात. सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना ही शिकवण कामी येते पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जयराम मोडके, पूर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांचे समायोजित भाषणे झाली.

आपल्या प्रमुख धम्मदेशनेमध्ये भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी कार्यक्रमा पाठीमागची भूमिका विशद केली समाजामध्ये जे अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करतात. जनतेची निरपेक्षपणे सेवा करतात. त्यांचा यथोचित सन्मान होणे गरजेचे आहे चैत्र पौर्णिमेचे महत्व अनन्यसाधारण आहे सेनानी पुत्री सुजाताने वडाच्या वृक्षाखाली कीर्तन केले खीरदान केले त्यावेळी बोधिसत्व भगवान बुद्धांनी सांगितले मी वन देवता नसून एक सामान्य मानव आहे व दुःखाचा शोध करून दुःख मुक्तीचा मार्ग शोधत आहे.

चैत्र पौर्णिमेलाच श्रीलंका मधील नागराजा महोदर आणि चूलो द रा या दोघांमधील युद्ध थांबून मैत्री प्रस्थापित झाली.या पौर्णिमेला भगवान बुद्धांनी मंगल मैत्रीबद्दल शिकवण दिली.ही महान शिकवण आचरणात आणली पाहिजे असे आपल्या धम्मदेशनेमध्ये ते म्हणाले.भदंत बोधिधम्मा यांनी आपल्या धम्मदेशनेमध्ये बुद्ध धम्मा मधील विनयाचे महत्त्व विशद केले.धम्मपिठावर भंतेइंद वंश लातूर व भंते पयाजीत यांची उपस्थिती होती.लातूर येथील ज्येष्ठ धम्म उपासक भरत कांबळे वैजापूर येथील जयप्रकाश भोरगे निर्मलाताई भो रगे, ताडकळस येथील दानशूर व्यक्तिमत्व शिवाजी कदम दैनिक देशोन्नती चे पत्रकार ग्रामपंचायतचे सदस्य सुरेश मगरे यांचाही त्यांच्या कार्याबद्दल विहार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास सुप्रसिद्ध आंबेडकर विचारवंत प्रकाश कांबळे, माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे, रेल्वे कामगार नेते अशोक कांबळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड पत्रकार विजय बगाटे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष शामराव जोगदंड भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे इंजिनीयर पीजी रणवीर साहेबराव सोनवने बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे बौद्धाचार्य यशवंत लांब सोंगे गंगाधर कांबळे संभाजी गायकवाड शाहीर गौतम कांबळे मुंजाजी गायकवाड गंगाधर खरे सेवानिवृत्त शिक्षक सोपान ढगे आदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला चैत्र पौर्णिमेनिमित्त मंगल ताई गौतम भोळे यांच्याकडून खीर दान करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी  विशाल कांबळे राहुल धबाले विजयकुमार खंडागळे  सुरज जोंधळे राम भालेराव व महिला मंडळांनी परिश्रम घेतले.... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या