🌟जिंतूर येथे उधारी मागितल्याच्या कारणावरून किराणा दुकानदारास जबर मारहाण....!


🌟दोन आरोपींच्या विरोधात जिंतूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल : व्यापारी बांधवा कडून कडक कार्यवाही करण्याची मागणी🌟 

जिंतूर (दि.२३ एप्रिल) - शहरातील मुख्य चौकात राघवेंद्र प्रोविजन स्टोअर्स या नावाने किराणा दुकान असून दुकान चे मालक गजानन भीमाशंकर वट्टमवार यांनी दोन-तीन वर्षापासून थकीत असलेली उधारी मागितली याचा राग मनात धरून दुकानात घुसून मारहाण केल्याचा प्रकार जिंतूर शहरात काल घडला याप्रकरणी जिंतूर पोलिसात आयुब मेहराज अली व हसन अली या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे 

याबाबत अधिक माहिती अशी की वरील दुकानदाराच्या घराच्या मागच्या बाजूला राहणारा आरोपी आयुब अली याने आपल्याला उधारीत का मागितली हा राग मनात धरून आपल्या भाच्याला बोलून  राघवेंद्र किराणा दुकानात घुसून गजानन वट्टमवार यास मारहाण केली  सदर घटना सीसीटिव्ही मध्ये  रेकॉर्ड झाली घटना घडल्यानंतर शेजारी  यांनी सोडवले यानंतर जिंतूर पोलिसात जिंतूर शहरातील अनेक व्यापारी मोठ्या संख्येने जमा झाले परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कुंदन कुमार वाघमारे यांनी तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले वरील आरोपी यांचे विरुद्ध गजानन वट्टमवार यांचे फिर्यादीवरून जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे भारतीय दंड विधान कलम 452 523 524 भादविनुसार गुन्हा दाखल झाला आहे परंतु अद्यापही आरोपीला अटक नसल्याने खडक कार्यवाही करावी अशी मागणी व्यापारी करत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या