🌟चिकलठाण्यातील श्रावस्ती कॉलनी (सावित्रीनगर) येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले यांची जयंती साजरी...!


🌟या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.रत्नदिप वेडे,सुनिल साळवे,विनोद वानखेडे,विक्रम गवई यांनी केले🌟


छत्रपती संभाजीनगर (दि.१२ एप्रिल) - येथील चिकलठाण्यातील श्रावस्ती कॉलनी (सावित्रीनगर) येथे क्रांतीसुर्य महात्मा जोतीबा फुले आणी महामानव विश्वरत्न परमपुज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त काल मंगळवार दि.११ एप्रिल २०२३ रोजी महात्मा जोतीबा फुले जयंती साजरी करण्यात आली.


यावेळी समाज प्रबोधनकार प्रा.अनिल मगर यांचा शिव,फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचारधारेवर आधारीत प्रबोधनात्मक एकपात्री भारूड हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.रत्नदिप वेडे,सुनिल साळवे,विनोद वानखेडे, विक्रम गवई यांनी केले तसेच समस्त जयंती मंडळ, श्रावस्ती महिला संघ, श्रावस्ती धम्म सेवा संघ,कार्यकर्ते,पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रा.नंदाताई सातपुते यांनी मानले....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या