💥पुर्णेत श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत धार्मिक व उत्साहपुर्ण वातावरणात साजरा.....!


💥या जन्मोत्सवात सर्व हनुमान भक्त लहान मुले महिला असे मोठ्या संख्येने हनुमान भक्त सहभागी 💥


पुर्णा (दि.०७ एप्रिल) - शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सव अत्यंत धार्मिक व उत्साहपुर्ण वातावरणात साजरा करण्यात आला असून या जन्मोत्सवात सर्व हनुमान भक्त लहान मुले महिला असे मोठ्या संख्येने हनुमान भक्त सहभागी झाले होते.


शहरातील शास्त्रीनगर येथील अष्टभुजा माता मंदिर येथे उत्साहाच्या वातावरणात श्री हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला असून हनुमान जन्मोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या महाप्रसादाचा लाभ शहर परिसरातील असंख्य हनुमान भक्तांनी घेतला तर हा जन्मोत्सव यशस्वी करण्यासाठी सुनील बागल,निलेश डोलारे अजय श्रीमल, अशोक राजकुंडल, अनिरुद्ध बागल, श्रीनिवास कडबाने,मनीष लोगटवार ,संजय सोतकेपली, ज्ञानेश्वर बागल व समस्त शास्त्रीनगर मित्र मंडळ आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या