🌟जंग-ए-अजितन्युज हेडलाईन्स - पुर्णा शहरातील महत्वाच्या बातम्या : पुर्णा सिटी टॉप १० न्युज....!


🌟पुर्णा न.पा.मुख्याधिकारी अजय नरळेंचे नागरी सुविधांकडे दुर्लक्ष : भ्रष्ट गुत्तेदारांची बिले काढण्याकडे मात्र विशेष लक्ष : सोमवार दि.१७ एप्रिल रोजी रात्री ०९-१५ ते ०९-४० दरम्यान नगर पालिकेत उपस्थित राहून भ्रष्ट गुत्तेदारांच्या देयकांवर केली स्वाक्षरी🌟 


१) पूर्णा रेल्वे परिसरात कचऱ्याच्या ढिगारासह घाणीचे साम्राज्य : रेल्वे प्रशासनाचे प्रवासी सुविधांकडे सपशेल दुर्लक्ष.

२) पुर्णेत श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त शहरातील अमृत नगरात श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन.

३) पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र मारकड यांचा वाढदिवस पुर्णा पोलीस स्थानकात मोठ्या उत्साहात साजरा : अधिकारी/कर्मचाऱ्यांसह विविध मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव.

४) पूर्णा रेल्वे स्थानकांसह परिसरात गुन्हेगारीं प्रवृत्तींनी काढले डोकेवर प्रवासी वर्गासह महिला प्रवासी देखील असुरक्षित : दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष.

५) पूर्णा शहरातील महावीर नगर परिसरातील झाकीर हुसेन चौक ते भारतीय स्टेट बँक पर्यंतच्या नाली बांधकामाच्या कामाला सुरुवात : सदरील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे होता कामा नए याकरिता नगर परिषद खबरदारी घेईल काय ? परिसरातील नागरिकांना पडला प्रश्न.

६) निजामबाद ते पंढरपूर रेल्वे गाडीचा अकरावा वर्धापन दिन पूर्णा रेल्वे स्थानकावर धुमधडाक्यात करण्यात आला साजरा.

७)पुर्णा : पोलीस हक्क संरक्षण संघटनेचे  संस्थापक अध्यक्ष व्याख्याते विनोद अण्णा भोसले यांना फोनवर शिवीगाळ करून जीवे मारण्याचे धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज पुर्णेचे तहसीलदार माधव बोथीकर यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.

८) पूर्णा तालुक्यातील मौ.सुरवाडी येथे विश्वरत्न महामानव प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

९) पुर्णेचे तहसीलदार मा.माधवराव बोथीकर यांच्या नियंत्रणाखाली आज बालविवाह निर्मूलन समितीची बैठक संपन्न.

१०) पुर्णा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे यांचे शहरातील नागरी सुविधांकडे दुर्लक्ष : भ्रष्ट गुत्तेदारांची बिले काढण्याकडे मात्र विशेष लक्ष : आज सोमवार दि.१७ एप्रिल रोजी रात्री ०९-१५ ते ०९-४० दरम्यान नगर पालिकेत उपस्थित राहून गुत्तेदारांच्या देयकांवर केली स्वाक्षरी 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या