🌟गंगाखेड ते पालम या रस्त्यावर बसची दुचाकीस्वारास धडक दुचाकीस्वार गंभीर जखमी....!


🌟जखमी युवकास पुढील उपचाराकरीता नांदेड येथे हलवण्यात आले आहे🌟

परभणी (दि.२५ एप्रिल) : गंगाखेड ते पालम या रस्त्यावरील महेश जिनिंग समोर एका बसने दिलेल्या जोरदार धडकेत सचिन जनार्दनराव भूजबळ नामक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना आज मंगळवार दि.२५ एप्रिल २०२३ रोजी घडली.

 दुचाकीस्वाराला धडक दिलेल्या बसचा क्रमांक एम.एच.२०-३४९० असा असून सदरील बस लोह्याकडून गंगाखेडकडे येत होती. त्यावेळी या बसने एका दुचाकीस जोरदार धडक दिली. त्या धडकेत दुचाकीवरील महेश भूजबळ हा युवक जखमी झाला. प्रत्यक्षदर्शनींनी या जखमी युवकास तातडीने गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात हलवले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार करीत या युवकास पुढील उपचाराकरीता नांदेडकडे रवाना केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या