🌟पुर्णेत कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्यांचे घंटे हलता हलणा अन् अस्वच्छतेचा डोंब्या नाग काही केल्या डोलना...!


🌟निर्लज्ज नगर परिषद प्रशासनासह स्वच्छता विभाग कर्तव्य तत्परतेच्या मार्गावर काही केल्या चालता चालना🌟


पुर्णा (विशेष वृत्त) - पुर्णा शहरात सर्वत्र अस्वच्छतेने कळस गाठला असून शहरात जागोजाग कचऱ्यांची ढिगार लागल्याचे निदर्शनास येत असतांना 'कचरा वाहतूक करणाऱ्या घंटागाड्यांचे घंटे हलता हलणा अन् अस्वच्छतेचा डोंब्या नाग निर्लज्ज प्रशासना प्रमाणे काही केल्या डोलना अन् निर्लज्ज नगर परिषद प्रशासनासह स्वच्छता विभाग कर्तव्य तत्परतेच्या मार्गावर काही केल्या चालता चालना ?' अशी एकंदर परिस्थिती शहरात सर्वत्र झाल्याचे निदर्शनास येत असून शहरातील विविध भागात स्वच्छते अभावी नाल्या प्रचंड प्रमाणात तुंबल्यामुळे नाल्यांतील गलिच्छ पाणी रस्त्यांवर वाहतांना देखील पाहावयास असून शहरात सर्वत्र कचऱ्यांचे ढिगार लागले असतांना कचरा वाहतूक करण्यासाठी असलेल्या घंटागाड्या ट्रेक्टर आदी वाहन अदृश्य झाल्याचे निदर्शनास येत आहे.


शहरातील लोकमान्य टिळक रोड,अशोकरोड,कुरेशी मोहल्ला,डोबी गल्ली,मुख्य बाजारपेठ,पोलिस स्थानक/पोलिस वसाहत परिसर,अजिज नगर,मस्तानपुरा नवी आबादी,नगर परिषद परिसर,रेल्वे स्थानक परिसर,आनंद नगर,आदर्श कॉलनी,बसस्थानक परिसर,सराफा बाजार,दत्त मंदिर परिसर,गणपती मंदिर परिसर,आण्णाभाऊ साठे नगर,कोळीवाडा,धनगर वाडा,कुंभार गल्ली आदी भागांसह शहरातील विविध परिसरांचे अक्षरशः उकरड्यांमध्ये रुपांतर झाल्याचे पाहावयास मिळत असून याकडे नगर परिषद प्रशासनासह स्वच्छता विभागाचे देखील दुर्लक्ष होत असल्यामुळे शहरात साथींचे आजार डोके वर काढतांना दिसत आहे.......


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या