🌟परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीला मिळाले स्पष्ट बहुमत....!


🌟महाविकास आघाडी 13,भारतीय जनता पार्टी 4 जागा तर 01 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी🌟


परभणी (दि.29 एप्रिल) : परभणी कृषि उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीने आज झालेल्या मतमोजनीत स्पष्ट बहुमत पटकावले असून एकूण 18 जागांपैकी महाविकास आघाडीने 13 जागी तर भारतीय जनता पक्षाने 4 जागांवर तर अपक्ष उमेदवाराने 01 जागेवर विजय मिळवला आहे.

जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले विद्यालयांतर्गत कै.अण्णासाहेब गव्हाणे सभागृहात आज शनिवार दि.29 एप्रिल 2023 रोजी सकाळी 08-00 वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला 10 वाजेच्या सुमारास हळूहळू कल लक्षात येवू लागला. 11-15 वाजेपर्यंत दोन राऊंड पूर्ण झाले होते तर दुपारी 02-00 वाजेच्या सुमारास निकालाचा स्पष्ट असा कौल दिसून आला.

 अंतीम निकाल पुढीलप्रमाणे

           सहकारी संस्था मतदारसंघ : गणेश रामभाऊ घाटगे यांना 577, पंढरीनाथ शंकरराव घुले यांना 517, अजय माधवराव चव्हाण 445, संग्राम प्रतापराव जामकर 515, अरविंद रंगराव देशमुख 435 या महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय पटकाविला. या मतदारसंघात भाजपाचे आनंद शेषराव भरोसे 529, विलास साहेबराव बाबर 416 मते घेवून विजयी झाले. तर ज्ञानोबा प्रभाकर कदम 296, बालासाहेब भिमराव गमे 10, रामप्रसाद दिगंबर गमे 242, गोविंद रामराव देशमुख 12, भुजंगराव बाबाराव धस 273, स्वराजसिंह शिवपालसिंह परिहार 77, चंद्रकांत पांडुरंग पांगरकर 4, तानाजी माणिकराव भोसले 328, सचिन किसनराव लोहट 347, उत्कर्ष विजयराव वरपुडकर 386, समशेर सुरेशराव वरपुडकर 338, प्रमोद प्रभाकरराव वाकोडकर 217 व दिलीप नरहरराव साबळे 22 या अन्य उमेदवारांना एवढी मते मिळाली.

           महिला मतदारसंघ ः काशिबाई रुस्तुमराव रेंगे यांनी 472, शोभा मुंजाजीराव जवंजाळ 554 मते मिळवून या महाविकास आघाडीच्या दोन्ही महिला विजयी झाल्या. तर रुख्मीणीबाई बाबुराव इंगळे यांना 6, छाया उध्दवराव खरवडे यांना 292, सोरजाबाई प्रभाकर मोरे यांना 2 व कौशल्याबाई दिनाजीराव रसाळ यांना 6, अनुसया एकनाथराव साळवे यांना 465 मते मिळाली.

            इतर मागासवर्गीय मतदारसंघ ः गंगाप्रसाद आबासाहेब आनेराव हे 564 मते घेवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी अहमद जाकेर अहमद रशीद यांना 9, विवेक विजयराव हरकळ यांना 367 मते मिळाली.

             विमुक्त जाती भटक्या जमाती ः सुरेश रामराव भुमरे हे भाजपचे उमेदवार 442 मते घेवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी स्वराजसिंह शिवपालसिंह यांना 437 मते मिळाली. गोकुळनाथ संतराव लोखंडे यांना 4, दामोदर बाजीराव सानप यांना 12 मते मिळाली.

            ग्रामपंचायत मतदारसंघ सर्वसधारण गटात पांडुरंग बालासाहेब खिल्लारे यांना 509 तर विनोद सखारामजी लोहगावकर यांना 456 मते मिळाली हे दोघे आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या मतदारसंघात संतोष बाबाराव इंगळे यांना 7, अभिजित अंबादासराव काळे यांना 398, प्रसाद लिंबाजी गरुड यांना 279, गणेश ज्ञानेश्‍वर देशमुख 207, मंगेश प्रल्हादराव भरकड यांना 13 व मंचक वाघ यांना 9, अब्दुल खालेद अब्दुल रशीद यांना 7 मते मिळाली.

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ ः घनशाम गणपतराव कनके हे 388 मते घेवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी विजया धर्मराज चव्हाण यांना 309, प्रशास ठाकूर यांना 1, सिध्दार्थ वायवळ यांना 2, संजय साखरवाड यांना 139, सीमा पांडुरंग सावंत यांना 6 मते मिळाली.

          आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ः राजाभाऊ बालासाहेब देशमुख हे भाजपचे उमेदवार 453 मते घेवून विजयी झाले. संदीप पुरभाजी झाडे यांना 424 तर मंचक रंगनाथ वाघ यांना 6 मते मिळाली.

          व्यापारी मतदारसंघात रमेश भिमराव देशमुख हे अपक्ष उमेदवार 638 मते मिळवून विजयी झाले. तर सोपान वसंतराव मोरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार 597 मते घेवून विजयी झाले. गणेश माणिकराव शेंगुळे यांना 567 मते मिळाली.

           हमाल व तोलारी मतदारसंघातून पठाण फैजूल्ला खान, अहमद खान हे आघाडीचे उमेदवार 267 मते घेवून विजयी झाले. संजय गायकवाड 18, रविदास नेटके 10, बाबाराव मोहटे 31, शेख अब्दुल रहीम शेख मोहम्मद यांना 90 तर अरुण सोनवने यांना 2 मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव यादव यांनी ही माहिती दिली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या