🌟परभणी जिल्ह्यात ७ ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित होणार....!


🌟महाराष्ट्र दिनापासून दवाखाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दिली🌟

परभणी (दि.३० एप्रिल) :- महाराष्ट्र राज्यात ५०% पेक्षा जास्त लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास असून शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागात अंतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रे १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत स्थापित होत आहेत. नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजना सुरू केली आहे. राज्यातील शहरी भागातील जनसामान्य, गोरगरीब, झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी वेळेवर व भक्कम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याची घोषणा केली केली होती.  

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे दवाखाने नागरिकांच्या सेवेत समर्पित होणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत नागरी आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्र १५ व्या वित्त आयोगा अंतर्गत स्थापित केली जाणार आहेत. राज्यात १५ वा वित्त आयोग अंतर्गत मंजूर नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे टप्प्याटप्प्याने रूपांतर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्रांमध्ये करण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात परभणी जिल्ह्याच्या ७ तालुक्यांमध्ये महाराष्ट्र दिनापासून दवाखाने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दिली आहे. 

त्या अनुषंगाने राज्यात ३४२ हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केंद्राचे डिजिटल अनावरण व लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या उपस्थितीत ०१ मे २०२३ रोजी सकाळी १०-०० वाजता करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते यांनी दिली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक अशा ९ ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू होणार आहे. या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, किरकोळ उपचार यासह रक्त चाचण्यांची सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय एक्स-रे, सोनोग्राफी इत्यादी चाचण्याकरिता पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात संबंधित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

विशेष तज्ञाच्या सेवा देखील उपलब्ध होतील. यात ओपीडी स्वरूपात सेवा देण्यात येणार आहे. आपला दवाखाना मध्ये बाह्य रुग्णसेवा, मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलि कन्सल्टेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत. तसेच या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषतः संदर्भ सेवा, आहारविषयक सल्ला, योगा व व्यायामबाबतचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार असल्याची माहिती  डॉ. राहुल गीते यांनी दिली. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या तालुक्यात सुरू होणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  विनय मून,  मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. राहुल गीते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास जगताप, मनपाच्या आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना सावंत यांनी केले आहे.आपला दवाखाना बाह्य रुग्णसेवा वेळ- दुपारी २.०० ते रात्री १०.०० राहणार आहे.

महाराष्ट्र दिन १ मे पासुन सुरु होणारे जिल्ह्यातील आपला दवाखाना ठिकाणे👇🏻

परभणी - आपला दवाखाना, राजा राणी मंगल कार्यालय, परभणी

पूर्णा - आपला दवाखाना,जुनी नगर परिषद इमारत, पूर्णा

गंगाखेड- आपला दवाखाना,गट शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या बाजूस, टेलिफोन ऑफिस च्या मागे, गंगाखेड

सोनपेठ- आपला दवाखाना, जुनी प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत, सोनपेठ

पाथरी -आपला दवाखाना,अझीज मोहल्ला, बाजार चौक, पाथरी

सेलू -आपला दवाखाना, हेमंत नगर, सेलू

मानवत - आपला दवाखाना, बौद्ध नगर, जिल्हा परिषद शाळा इमारत,मानवत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या