🌟पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा कौतुकास्पद उपक्रम...!


🌟भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शाळेत दोन तास वाचन उपक्रम संपन्न🌟 

पुर्णा (दि.१२ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज दि.12 एप्रिल 2023 रोजी महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन तास वाचन उपक्रम पार पडला.


यावेळी सर्व प्रथम महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन शाळेचे मुख्याध्यापक गोविंद नलबलवार,सहशिक्षक विलास बोकारे,आबनराव पारवे व योगिता कुलकर्णी यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके अगदी मनलाऊन वाचली.विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी,हा या उपक्रमाचा उद्देश होत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिवसाचे अठरा-अठरा तास वाचन केले तर आपणही दोन तास वाचन करून त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहू,असा आमचा संकल्प आम्ही पूर्ण केल हा वाचनाचा उपक्रम अगदी यशस्वीपणे पार पडला....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या