🌟पुर्णा नगर परिषद निवडणूकीवर सर्वांचा डोळा ? प्रत्येक बोक्याला मिळतो इथे शासकीय विकासनिधीरुपी लोण्याचा समान गोळा ?

🌟मागील निवडणूकीत निवडून आलेल्यांचा थाटमाट बघून आता भावी नगरसेवकांच्या झुंडीच्या झुंडी उतरणार मैदानात🌟

✍🏻विशेष वृत्त - चौधरी दिनेश (रणजीत)

परभणी जिल्ह्यात सातत्याने भ्रष्ट व गैरकारभारात चर्चेत राहणारी एकमेव नगर पालिका म्हणून नावारुपाला आलेल्या पुर्णा नगर परिषदेचा कार्यकाळ २७ डिसेंबर २०२१ रोजी संपला नियमाप्रमाणे जनमतातून निवडून आलेल्या तत्कालीन नगराध्यक्षा गंगाबाई सितारामअप्पा एकलारे यांनी पदभार सोडला व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने प्रशासक म्हणून गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्यातील ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर झाल्यामुळे जिल्हा परिषद,नगर परिषदेसह पंचायत समिती निवडणूकांचे बिगूल काही वाजलेच नाही त्यामुळे मुद्दत संपलेल्या पुर्णा नगर परिषदेची निवडणूक केव्हा होईल याकडे आजी/माजी अन् भावी नगरसेवकांचे लक्ष लागले असून मुद्दत संपून तब्बल १६ महिन्यांचा कालावधी उलटत असतांना देखील राज्य शासनाकडून निवडणूकीची घोषणा होत नसल्यामुळे पुर्णा नगर परिषद निवडणूक लढवून नगर परिषदेत जाण्याची स्वप्न रंगवणारे हौसे/नवसे/गवसे अक्षरशः गुडघ्याला बाशींग बांधून बसल्याचे निदर्शनास येत आहे पुर्णा नगर परिषद जिल्ह्यातील अशी एकमेव नगर परिषद आहे ज्या नगर परिषदेत विरोधी पक्षाचे अस्तित्व अद्याप पर्यंत जाणवले नाही कारण पुर्णा नगर परिषदेत जनहीताशी बांधिलकी जोपासून जनहीताच्या प्रश्नांवर लढा देणारे कमी आणि स्वतःच्या हितासाठी मतभेद पक्षभेद जाती धर्म भेदांना मुठमाती देऊन 'हम साथ साथ हैं' म्हणून शासकीय विकासनिधीचे समसमान हिस्से वाटप करणारे प्रतिनिधीच सातत्याने निवडून येत असल्यामुळे कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील शहराचा विकास कमी आणि शहर भकास मात्र मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास येत आहे.  

त्यामुळे अल्पकालावधीत रोडपती ते करोडपती बनन्याचा एकमेव मार्ग नगर परिषदच असल्याची जाणीव प्रत्येक हवस्या नवस्या अन् गवस्याला झाल्यामुळे काही जरी झाले तरी नगर परिषद निवडणूक लढवायची आणि रोडपती ते करोडपती असा प्रवास सुखद करायचा या उद्देशाने असंख्य आजी/माजी अन् भावी नगर परिषदेच्या निवडणूकीवर डोळा ठेवून बारसे/वाढदिवस/सत्य नारायन/लग्न समारंभ/व्यवसायिक प्रतिष्ठानांचे उद्घाटन/अंत्यसंस्कार/तेरवी/वर्षश्राध्द आदी कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतांना पाहावयास मिळत आहेत शहरात वाढदिवसांचा तर जणूकाही क्रेजच आल्याचे निदर्शनास येत असून मागील पाच वर्षात कार्यकर्त्यांच्या कापल्या करंगळीवर देखील न मुतनारे महाभाग आवर्जून कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावूत १०० रुपयांचा केक/५० रुपयांचा हार अन् ६० रुपयांचा गमछा घेऊन २१० रुपयात कार्यकर्त्याला अक्षरशः 'आनंदयात्रेचा' सुखद आनंद घडवतांना पाहावयास मिळत आहेत.

पुर्णा नगर परिषदेच्या मागील सन २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत जनमतातून शिवसेनेच्या तिकिटावर नगराध्यक्षपदावर गंगाबाई सितारामअप्पा एकलारे या बहुमताने निवडून आल्या होत्या तर या निवडणूकीत शहरातील एकंदर १० प्रभागातून शिवसेनेचे ०५ नगरसेवक,राष्टूरवादी काँग्रेस पक्षाचे ०८ नगरसेवक,राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा ०१ नगरसेवक तर अपक्ष म्हणून ०६ नगरसेवक निवडून आले होते तर स्विकृत सदस्य पदावर शिवसेना ०१,राष्ट्रवादी काँग्रेस ०१ असे दोन सदस्य निवडून आले होते परंतु या पाच वर्षाच्या कालावधीत शहराच्या तथाकथित विकासासाठी सर्वांनीच पक्ष भेद जाती भेद धर्म भेद मत भेदांना मुठमाती देत मातीचे देखील सोने केल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे निवडून आलेल्यांचा थाटमाट बघून आता भावी नगरसेवकांच्या झुंडीच्या झुंडी मैदानात उतरण्याची रिहर्सल करतांना पाहावयास मिळत आहेत........

      


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या