🌟पुर्णा तालुक्यातील भाटेगाव मागील दोन महिन्यापासून अंधारात....!


🌟अंधेरा कायम रहें या आवेशातील महावितरण अधिकारी/कर्मचाऱ्यांचे भाटेगावातील परिस्थितीकडे दुर्लक्ष🌟

🌟गावातील गावठाण डिपीला कोणीच वाली नाही ?🌟

पुर्णा (दि.११ एप्रिल) - पुर्णा तालुक्यातील भाटेगाव मागील दोन महिन्यापासून सातत्याने अंधाराशी संघर्ष करीत असून गावातील डिपी तिन ते चार वेळा महावितरण कार्यालय परभणी येथून नविन डिपी आणून देखील फक्त काही मोजके तास चालू राहतो व पुन्हा लगेचच डिपी बंद पडतो परभणी येथील महावितरण दुरूस्ती कार्यालयात जो डिपी दुरुस्त करून दिला जातो व तोच डिपी गावात आला की बोटावर मोजन्या इतके घंटे चालतो व पुन्हा गाव अंधारात चाचपडत राहते.

या गावातील लोकांनी महावितरण च्या कर्मचार्यांना वारंवार सांगून देखील महावितरण कर्मचार्यांरी गावाकडे दुर्लक्ष करत आहेत दोन महिन्यांत फक्त बोटावर मोजता येतील इतकेच तास विज चालू राहते गावकर्यांनी  पूर्णा येथील तांत्रिक अभियंता श्री वसमतकर यांना सांगून देखील विजेचा कोणत्या ठिकाणाहून विजेचा पुरवठा होत नाही याची पाहणी करायला देखील महावितरण कर्मचार्यांरी तयार नाहीत वारंवार उडवा उडविची उत्तरे गावकऱ्यांना दिली जातात. गावातील विजेचा प्रश्न आज पर्यंत सुटत नाही...? तालुक्यातील बर्याच गावात विजेचा प्रश्न ऐरणीवर आलाय तरी देखील महावितरण च्या कुठल्याच कर्मचार्याला तालुक्यातील विजेच्या प्रश्नाचे गांभीर्य राहीलेले नाही जाणून बुजून तालुक्यातील बर्याच गावात विजेचा प्रश्न ऐरणीवर आणला जातोय तालुक्यातील भाटेगाव, सुहागण, बरबडी,आव्हई अशा बर्याच गावात विजेचा पुरवठा होत नाही लवकरात लवकर या गावांचा विजेचा प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी मागणी नागरिकांतुन होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या