🌟गंगाखेडच्या ‘त्या’ ठाणे अंमलदारावर कार्यवाही होणार - पो.नि. बोरगांवकर


🌟प्रकरणाची रीतसर तक्रार कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी आज दाखल केली असता त्यांनी ही माहिती दिली🌟

गंगाखेड : दागीने चोरीची फिर्याद देण्यासाठी ठाण्यात आलेल्या महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार गंगाखेड पोलीस ठाण्यात घडला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती, पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी दिली आहे. या प्रकरणाची रीतसर तक्रार कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी आज दाखल केली असता त्यांनी ही माहिती दिली. 


शिरूर ताजबंद येथील सौ गजराबाई पौळकर या महिलेच्या गळ्यातील दागीने २७ एप्रिल रोजी गंगाखेड बसस्थानकावरून लांबवण्यात आले. या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यास आलेल्या महिलेची तक्रार दाखल करून न घेता ठाणे अंमलदार शंकर रेंगे यांनी त्यांना अरेरावीची भाषा केली. तसेच सोबतच्या नातेवाईकांनाही अपमानीत केले. हा प्रकार पोलीस निरीक्षकांच्या कानावर टाकल्याने अधिकच भडकलेल्या रेंगे यांनी सौ पौळकर यांचीच आरोपीप्रमाणे ऊलटतपासणी केली. या प्रकारामुळे भांबावलेली पिडीत महिला लेखी अर्ज देवून तीच्या गावी निघून गेली. 

या प्रकरणाची चौकशी करून ठाणे अंमलदार शंकर रेंगे यांचेवर शिस्तभंगाची कार्यवाही करावी, अशी मागणी आज कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केली. पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांची भेट घेवून त्यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रकरणाची आमच्या स्तरावरून चौकशी सुरू आहे. त्या दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज आणि तत्सम बाबींची तपासणी करून योग्य कार्यवाही केली जाणार असल्याचे बोरगावकर यांनी सांगीतले आहे. पोलीस निरीक्षक स्तरावरून कार्यवाही न झाल्यास हा प्रकार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकुरकर यांच्या निदर्शनास आणून दिला जाणार असून कार्यवाहीसाठी पाठपुरावा केला जाणार असल्याचे गोविंद यादव कळवले आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक आर रागसुधा यांनी याआधीच तक्रारीची दखल घेतली असून पोलीस निरीक्षक बोरगावकर यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत. मुजोर ठाणे अंमलदार शंकर रेंगे यांच्यावर काय कार्यवाही होते, याकडे पोलीस खात्यासह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या