🌟ओबीसी समुदायाने आंबेडकर समजून घेण्याची गरज- बाबासाहेब कांबळे यांचे प्रतिपादन...!


🌟संजय रायबोले यांना समाज भूषण पुरस्कार 🌟

राणीसावरगाव- बातमीदार/प्रतिनिधी 

डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील शोषित, पिडीत,वंचित ओबीसी समाजाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून शिक्षण, आरक्षण दिले आहे त्यामुळे मागासवर्गीय म्हणून आरक्षणाचा लाभ घेणा-या ओबीसी समुदायाने भारतीय संविधान आणि डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांनी राणीसावरगाव येथे गुरूवारी ता.27 रोजी डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बोलताना  केले. 

यावेळी सकाळी दहा वाजता पंचशिल ध्वजाचे  ध्वजारोहन, सामूहिक वंदना व अभिवादन सभेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. अशोकराव कांबळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.बाबासाहेब कांबळे, श्री. हनुमंतभाऊ मुंढे, सरपंच राजेश जाधव,उपसरपंच गफार शेख, माजी सरपंच सोमनाथ कुदमुळे, प्रा. डाॅ. संतोष हंकारे, प्रा.डाॅ. बालाजी गव्हाळे, प्रा.डाॅ. शंकर घाडगे, सय्यद मुस्सदिक, कुलदीप कांबळे, राजाराम साबणे, सामाजिक कार्यकर्ते सोपानराव नागरगोजे, नारायण डोणे, सरपंच बालाजी लटपटत, गोविंद डोणे, बालासाहेब फुगनर, सतिश चव्हाण, सयद नबु, आबासभाई, नारायण नांदूरे आदींची उपस्थिती होती. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहूल बानाटे यांनी केले. सायंकाळी अभिवादन रॅली तसेच रात्री भीमाची वाघीण फेम प्रिती भालेराव यांचा संगीत रजनीचा कार्यक्रम शांततापूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास महिला व पुरुषांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती

* संजय रायबोले यांना समाज भूषण पुरस्कार :-

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने सामाजिक कार्य,साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल देण्यात येणारा यावर्षीचा समाज भूषण पुरस्कार महाकवी वामनदादा कर्डक यांच्या अप्रकाशित मराठी गझलांचा संग्रह करून गझलकार वामनदादा अशी नवी ओळख निर्माण करणारे   "वंचित गझलसंग्रह-गझलकार वामनदादा कर्डक " नावाचे पुस्तक संपादित करून मराठी साहित्यात भर टाकल्याबद्दल तसेच उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल श्री. संजय रायबोले यांना समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर यावेळी शैक्षणिक कार्याबद्दल संस्कृत विषयात पीएचडी केलेले प्रा.डाॅ. शंकर घाडगे, प्रा.आत्माराम सोनकांबळे, तसेच सहकार क्षेत्रातील पदोन्नतीबददल श्री. दशरथ सावंत यांना देखील समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

फोटो ओळी- समाज भूषण पुरस्काराने श्री. संजय रायबोले यांना सन्मानित करताना बाबासाहेब कांबळे,हनुमंतभाऊ मुंढे आदी मान्यवर दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या