🌟पुर्णा तालुक्यातील गोळेगाव येथे महालक्ष्मी यात्रे निमित्त भव्य कुस्त्यांची दंगल संपन्न.....!


🌟या कुस्त्यांसाठी महिलां पहिलवान यांनी देखील सहभाग नोंदवला🌟

पुर्णा (दि.०७ एप्रिल) - तालुक्यातील गोळेगाव येथील महालक्ष्मी यात्रेनिमित्ताने भव्य कुस्त्यांच्या दंगली आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते. ही शेकडो वर्षांची परंपरा गावकरी एकजुटीने जोपासत असून कुस्ती दंगलीतील विजयी पहेलवानांना रोख स्वरुपात बक्षीसे देण्यात आली. तर या कुस्त्यांसाठी महिलां पहिलवान यांनी देखील सहभाग नोंदवला होता यावेळी महिला  पहिलवानाला बक्षीस देताना  शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई लक्ष्मणराव गोळेगावकर, दुधाटे, दुधाटे,गणेशराव, दुधाटे पैलवान, सुरेश दुधाटे, नागेश दुधाटे, बंडू दुधाटे, हनुमान दुधाटे   तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या