🌟मुंबईतील विक्रोळी येथील प्रवासी महिलेची रेल्वे प्रवासात रेल्वेत विसरलेली बॅग अखेर दिली वापस...!


🌟सदरील बॅग रेल्वे पोलीस एएसआय.माधव दुसरे,हेकॉ.दिलीप लोणारे यांनी सौ.अश्विनी किरण मानकर यांना सुपूर्द केली🌟

छत्रपती संभाजी नगर (दि.११ एप्रिल) - मुंबईतील विक्रोळी येथील प्रवासी महिला सौ.अश्विनी किरण मानकर ह्या आज मंगळवार दि.११ एप्रिल रोजी आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लासूर येथील देवी दाक्षायनी मातेच्या दर्शनासाठी मुंबई-हुजूर साहीब नांदेड तपोवन एक्स्प्रेस मधून लासूर स्टेशन येथे दुपारी ०१-४५ वाजेच्या सुमारास उतरून घरी गावाकडे निघून गेली त्यावेळी त्यांची एक बॅग रेल्वेतच विसरली.

यावेळी लासूर स्टेशन येथील स्टेशन मॅनेजर राजेश गुप्ता यांनी रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांना संपर्क साधला यावरून रेल्वे सेना गोल्डन ग्रुप सदस्य मनीष मूथा यांनी हि बाग रेल्वे पोलीस ठाणे छत्रपती संभाजीनगर येथे जमा केली रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांनी ही माहिती तात्काळ सर्वच व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवली महिला प्रवासी यांनी रेल्वे सेना अध्यक्ष सोमाणी यांना संपर्क साधला सदरील बॅग रेल्वे पोलीस एएसआय.माधव दुसरे,हेकॉ.दिलीप लोणारे,रेल्वे प्रवासी सेना अध्यक्ष संतोषकुमार सोमानी यांनी सौ.अश्विनी किरण मानकर यांना सुपूर्द केली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या