🌟परभणीत समाजहित अभियान डॉ.बाबासहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अन्नदान व पाणी वाटप....!


🌟कार्यक्रमास छगन सावने व प्रफुल्ल ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती🌟

परभणी (दि.१४ एप्रिल) - परभणी शहरातील समाजहितासाठी सामाजिक कार्य करणारी सामाजिक संस्था समाजहित अभियान प्रतिष्ठान आयोजित समाजहित अभियान डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने आज शुक्रवार दि.१४ एप्रिल रोजी डॉ.आंबेडकर नगर,आय.टी.आय. कॉर्नर, जिंतूर रोड परभणी येथे माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या सौजान्याने खिचडी स्वरूपात भव्य अन्नदान व पाणी वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन समाजहित अभियान डॉ.आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष आकाश साखरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती छगन सावने व प्रफुल्ल ढगे यांची उपस्थिती होती. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष तथा समन्वयक प्रमोद अंभोरे, शेख अझहर, अजय शिराळे, रमेश घनघाव,  विकास जमधाडे, शंकर बनसोडे, दीपक बनसोडे, विनोद वाडेकर, आकाश राक्षे, प्रकाश अंभोरे, रामसिंग अंभोरे, रमाताई घोंगडे, सरीताताई अंभोरे, राजू घोगरे, अजय अंभोरे, नितीन गवळी, बंटी गायकवाड, वैभव गायकवाड, युवराज सोनवणे, वंदनाताई खिल्लारे, रेखाताई कांबळे,आदींनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या