🌟कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील ग्रामपंचायत मतदार संघावर राष्ट्रवादीची पकड - मा.आ.विजयराव भांबळे


🌟सेलु कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार विजयराव भांबळे यांचे वर्चस्व🌟 

जिंतूर प्रतिनीधी / बि.डी.रामपूरकर

   कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर, सेलू व बोरी या तीन ठिकाणी आज रोजी मतमोजणी पार पडली यामध्ये सेलु येथे 18 पैकी 12 जागांवर महाविकास आघाडी च्या उमेदवारांना घवघवती यश आले असून सेलु कृषी उत्पन्न बाजार समितीवर माजी आमदार विजयराव भांबळे यांनी वर्चस्व स्थापन केले आहे.

 तर बोरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामपंचायत मतदार संघात चार व हमाल मतदार संघातील एक, व्यापारी मतदारसंघात एक अशा पद्धतीने उमेदवारांना यश आले आहे. त्यात ग्रा प मतदार संघातून नंदकिशोर अंभोरे, रोहिणकर स्नेहा (वाघीकर), विश्वंभर पवार, शेख मोबिन कुरेशी तर व्यापारी मतदार संघातून संतोषराव चौधरी व हमाल मतदार संघातून नितनवरे सुदाम हे विजयी झाले आहेत.

 तसेच जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्वात मोठा मतदार वर्ग असणाऱ्या ग्रामपंचायत मतदार संघात चार जागापैकी चारही जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. त्यात ग्राम पंचायत मतदार संघातून विश्वनाथ राठोड, गणेशराव ईलग, रामराव उबाळे व मनोज थिटे हे मताधिक्याने निवडून आले आहेत. 

एकूणच तीनही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ग्रामपंचायत मतदार संघावर महाविकास आघाडीने वर्चस्व स्थापन केले असून ग्रामपंचायत मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाची चांगली पकड असल्याचे मा आ विजयराव भांबळे साहेब यांनी सांगितले.

यावेळी निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे मा.आ.विजयराव भांबळे साहेब यांनी अभिनंदन केले व सर्व मतदारांचे आभार मानले यावेळी अजयभैया चौधरी, बाळासाहेब घुगे मुरलीधर मते अनंतराव देशमुख ज्ञानेश्वर गायकवाड पवन जाधव जगदीश राव शेंद्रे अभिनय राऊत दिनकर सातपुते रामजी शर्मा प्रभाकर जी वाघीकर मोबीन कुरेशी  यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या