🌟भगवान सत्यसाईं महासमाधी दिन विविध उपक्रमांनी साजरा...!


🌟अवघा गडचिरोली जिल्हा झाला भक्तिमय🌟

गडचिरोली (दि.२६ एप्रिल) - स्थानिक जिल्हा मुख्यालयासह विविध भागात भगवान सत्यसाई बाबांचा महासमाधी दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. सत्यसाईंच्या निस्सीम भक्तांनी तो विविध उपक्रमांच्या माध्यमातून भक्तिभावाने साजरा केला. त्यामुळे अवघा गडचिरोली जिल्हाच सत्यसाईंच्या भक्तीत  भक्तिमय झाल्याचे दिसून आले.

      २४ एप्रील हा भगवान सत्यसाईबाबांचा महासमाधी दिवस असतो. सदर दिवस साईभक्तांकडून आराधना दिवस म्हणून सर्वत्र पाळला जातो. या दिवशी सत्य साईबाबांच्या निस्सीम भक्तांकडून समाजोपयोगी तसेच आध्यात्मिक उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येतात. यंदाही त्यात सातत्य राखत गडचिरोली जिल्ह्यातील साईभक्तांनी सुद्धा सक्रिय सहभाग दर्शविला आहे. दि.२४ एप्रिल २०२३ रोजी भगवान सत्यसाईबाबा महासमाधी दिनी मोठ्या भक्तिभावाने विविध उपक्रम राबविले गेले. यामध्ये गडचिरोली येथील सत्यसाई समिती, अहेरी येथील सत्यसाई समिती यांतील भक्त मंडळींनी तसेच टेंभा, वडधा येथील सत्यसाई भजनी मंडळांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. त्या प्रत्येक गावात पहाटे ओमकार, सुप्रभात, नगरसंकिर्तन व संध्याभजन इत्यादि आध्यात्मिक उपक्रमांनी भक्तिमय वातारण निर्माण झाले होते. त्याचप्रमाणे गावात महाप्रसादाचे वाटप सुद्धा केले गेले. या महाप्रसादाचा लाभ जवळजवळ ४१२२ नारायणांनी म्हणजेच भाविक लोकांनी घेतला असल्याचे समजते. 

      गडचिरोली जिल्हा सत्यसाई संघटना द्वारे करमटोला, मसली (वाकडी), मोदुमोडगू (आलापल्ली) व चिचगुंडी या चार गावांना त्यांची सामाजिक, आध्यात्मिक, आर्थिक अशी सर्वंकष उन्नती करण्यासाठी दत्तक घेतले आहे. या गावातील गावकऱ्यांना सुद्धा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या व्यतिरीक्त चुरचुरा, कनेरी, मरेगाव येथील साईभक्तांनीही गावात महाप्रसादाचे वाटप केले. त्याचप्रमाणे गडचिरोली येथील आरमोरी रोडवर शितपेय पन्ह्याचे वितरण सुमारे ७०२ लोकांना करण्यात आले. याप्रसंगी जिल्हावासी जनता या सत्यसाई भक्तांतील प्रेमळपणा, नम्रता, शिस्तबद्धता आदी चांगुलपणा पाहून प्रभावित होत होती, हे विशेष! अशी माहिती कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी यांनी आमच्या प्रेसटीमला दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या