🌟पुर्णा तालुक्यातील अवकाळी पाऊस गारपिटीत नुकसान झालेल्या 'त्या' पिकांचे पंचनामे अखेर सुरू...!


🌟गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टेंनी केली होती जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ पंचनाम्याची मागणी🌟

 


पुर्णा (दि.२६ एप्रिल) - पुर्णा तालुक्यात काल मंगळवार दि.२५ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे तालुक्यातील आलेगाव, कळगाव, चुडवा, पिंपरण, धनगर टाकळी, धानोरा मोत्या, पिंपळा भात्या, मिठापुर व सारंगी या गावातील कापूस, ऊस, सोयाबीन व फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे गंगाखेड विधानसभेचे संवेदनशील आ.डॉ.रत्नाकर गुट्टे साहेब यांनी 'त्या' नुकसानग्रस्त (क्षतीग्रस्त) पिकांचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी जिल्हाधिकारी आणि पूर्णा तहसीलदार यांच्याकडे केली. त्यामुळे अखेर पंचनामे सुरू झाले आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या