🌟गंगाखेड येथील स्वदेशी आखाड्यात अनोख्या पध्दतीने भिमजयंती साजरी....!


🌟नवा लोंढा परिसरातील मैदानावर अनोख्या पध्दतीने योग साधना करून महामानवाच्या जयंती दिनी अभिवादन🌟


गंगाखेड (दि.१४ एप्रिल) - गंगाखेड येथे वास्तव्यास असलेल्या स्वदेशी आखाडा योग साधकांच्या समुहाकडून  सहशिक्षक प्रकाश डीकळे आणि राजेभाऊ घोगरे यांच्या संकल्पनेतून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त दि.१४ एप्रिल २०२३ रोजी सकाळी सहा गंगाखेड येथील नवा लोंढा परिसरातील मैदानावर अनोख्या पध्दतीने योग साधना करून महामानवाच्या जयंती दिनी अभिवादन करण्यात आले.


  
यावेळी योगशिक्षक श्री.प्रकाशजी डिकळे सर, शिवव्याख्याते प्रा. गणेश जाधव सर, राजेभाऊ घोगरे , राम टोले , दतराव जाधव,  सुदाम निरस,  प्रकाश बाळस्कर, रवि आवंके, कल्याण आळसे, प्रकाश लव्हाळे,  सोपानराव गिराम, राजु घोगरे, जिप शिक्षक भागवत करपुडे सर, बाळासाहेब बेदरे, बेद्रे राठोड सर यांच्या वतीने डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय र..हे प्रसिद्ध गीत सादर केले.

महामानवाला जात-धर्मात बंदिस्त न करता सामाजिक समतेसाठी आयुष्य वेचलेल्या सर्व  महापुरूषांचे विचार खरया अर्थाने रोजच्या जीवनात आचरण करण्याची गरज असल्याचे या समूहाने दाखवून दिले आहे. योग साधने सारख्या वेगळ्या माध्यमातून महापुरूषांच्या प्रेरक विचारांना उजाळा देणा-या स्वदेशी आखाडा ग्रूपचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. 


* स्वदेशी आखाडा नवा मोंढा परिसर गंगाखेड : राजेभाऊ घोगरे

याबाबत आमचे मित्र तथा मार्गदर्शक राजेभाऊ घोगरे यांनी सांगितले की, आम्ही स्वदेशी आखाडा या ग्रूपच्या माध्यमातून दररोज सकाळी योग व व्यायामाला जात असतो. आमचे मार्गदर्शक रावराजूर येथे सहशिक्षक असलेले प्रकाश डीकळे सर हे आम्हाला मार्गदर्शन करीत असतात. १४ एप्रिल रोजी आपण सर्व मित्रांनी एकत्रितपणे दररोजच्या प्रमाणे सकाळी परंतू अंघोळ करून लवकर यायचं ठरवलं.ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजता डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो, झेंडा , पुजेचे साहित्य, ध्वनीक्षेपक व बसण्यासाठी चटई घेऊन आम्ही मैदानात जमलो आणि महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून योग साधना, ध्यानसाधना करून अभिवादन केले.  नेहमीपेक्षा आजच्या दिवशी डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त योग करताना आम्हाला खुप आनंदी वाटले. अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या