🌟क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार आचरणात आणण्याची गरज.....!


🌟प्राध्यापक डॉ.व्यंकटराव कदम यांचे प्रतिपादन🌟

पुर्णा (दि.१२ एप्रिल) - भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्ध सार्वजनिक जयंती मंडळ  यांच्यावतीने महात्मा फुले नगर या ठिकाणी भदंत डॉ.उप गुप्त महा थे रो जयंती मंडळाचे अध्यक्ष भदंत पया वंश भदंत बोधी धम्म यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त  अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी सदस्य प्राध्यापक डॉक्टर व्यंकटराव कदम हे होते.

यावेळी प्रमुख सत्कारमूर्ती पूर्णा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे गटनेते उत्तम भैया खंदारे,प्रमुख अतिथी नगरसेवक एडवोकेट धम्मा जोंधळे,एडवोकेट राहुल कांबळे आदींची उपस्थिती होती.यावेळी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समग्र जीवन कार्यावर प्रकाश टाकताना प्राध्यापक डॉक्टर व्यंकटराव कदम यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे शैक्षणिक विचार समाज सुधारण्याचे विचार अंधश्रद्धा रू डी परंपरा यावर केलेले त्यांनी प्रहार यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले.त्यांचे समाज सुधारण्याचे विचार शैक्षणिक विचार प्रत्येक भारतीयांनी आचरणात आणणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले माजी उपनगराध्यक्ष उत्तम भैया खंदारे व त्यांच्या सुविद्य पत्नी विशाखा ताई यांचा महात्मा फुले नगर वाशी यांच्या वतीने भावपूर्ण सत्कार करण्यात आला त्यांनी अथक प्रयत्न मधून परिसरातील जनतेच्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी भव्य सभा मंच प्रशस्त जागेमध्ये निर्माण करून दिला.

भविष्यामध्ये या ठिकाणी सर्व सुविधा युक्त क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक सभागृह निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले.भदंत बोधी धम्मा यांनी आपल्या धम्मदेशनेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले होते आपल्या गुरूचे कार्य त्यांनी पूर्ण केले कार्यक्रमाचे प्रस्ताविक भारतीय बौद्ध महासभेचे शहराध्यक्ष बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे यांनी केले सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव अतुल गवळी यांनी केले भिकू संघाचे आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.लिंबू नी महिला मंडळाच्या वतीने खीर दान करण्यात आले.

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुकाध्यक्ष एम यु खंदारे शामराव जोगदंड बाबाराव वाघमारे तसेच ज्ञानोबा जोंधळे गंगाधर खरे मुंजजी गायकवाड शिवा हातागळे जयंती मंडळाचे उपाध्यक्ष साहेबराव सोनवणे राहुल धबाले तसेच लिंबूनि महिला मंडळ माता रमाई महिला मंडळ निरंजना महिला मंडळ रोहिणी महिला मंडळ जयंती मंडळाचे पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या